जाहिरात

Pahalgam Terrorist Attack : केंद्र सरकारने बोलावली आज सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात सरकारने आज गुरुवारी (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.

Pahalgam Terrorist Attack : केंद्र सरकारने बोलावली आज सर्वपक्षीय बैठक, मोठा निर्णय घेण्याची शक्यता

Pahalgam Terrorist Attack : काश्मीर पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर सरकारने आज गुरुवारी (24 एप्रिल) सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक आयोजित करण्यात आल्याचं सांगितलं जात आहे. सरकारकडून गृहमंत्री अमित शाह आणि परराष्ट्र मंत्री एस जयशंकर सर्वपक्षीय बैठकीत ब्रीफ करतील. गृहमंत्री अमित शाह आणि राजनाथ सिंह या मुद्द्यावरुन विविध पक्षाच्या नेत्यांशी बातचीत करीत आहेत. काँग्रेससह अनेक विरोधी पक्षांकडून या विषयावर सर्वपक्षीय बैठक बोलावण्याची मागणी केली होती. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 28 जणांचा हकनाक बळी गेला. आज सायंकाळी सहा वाजता आयोजित केलेल्या सर्वपक्षीय बैठकीय पहलगाममधील हल्ल्यासंदर्भात चर्चा केली जाणार असल्याची माहिती आहे. 

Pahalgam Terrorist Attack : आज डोंबिवली बंद! पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते एकवटले

नक्की वाचा - Pahalgam Terrorist Attack : आज डोंबिवली बंद! पहलगाम दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ सर्वपक्षीय नेते एकवटले

पाकिस्तान विरोधात भारताचे पाच महत्त्वाचे निर्णय...


बुधवारी सायंकाळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली कॅबिनेट कमिटी ऑन सिक्युरिटीची महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत पाकिस्तानविरोधात पाच कडक निर्णय घेण्यात आले. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींसह गृहमंत्री अमित शाह, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोभाल आणि परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर उपस्थित होते. 

हे' आहेत ते 5 निर्णय 

  1. सिंधु पाणी करार स्थगित 
  2. पाकिस्तानी नागरिकांसाठी भारतीय व्हिसा बंद 
  3. पाकिस्तानी दुतावासांना भारत सोडण्याचे आदेश 
  4. अटारी वाघा बॉर्डर 1 मे पर्यंत बंद राहणार 
  5. भारतातील पाकिस्तानी उच्चायोग बंद