जाहिरात

Akola News : शिक्षणासाठी शहरात आला, 20 वर्षीय तरुणाचा भरदिवसा मर्डर; क्षुल्लक कारणातून घेतला जीव

घरापासून दूर अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. गौरव हा शांत स्वभावाचा आणि अभ्यासू असल्याचे गावकरी सांगतात.

Akola News : शिक्षणासाठी शहरात आला, 20 वर्षीय तरुणाचा भरदिवसा मर्डर; क्षुल्लक कारणातून घेतला जीव

योगेश शिरसाट, प्रतिनिधी

Akola News : अकोला जिल्ह्यातील बाळापुर तालुक्यातील उरळ पोलीस स्टेशन हद्दीत आज सोमवारी सकाळी एक धक्कादायक घटना घडली. निंबा-तेल्हारा मार्गावरील कारंजा फाट्याजवळ २० वर्षीय गौरव बायस्कार याची काही तरुणांनी चाकूने वार करीत निर्घृणपणे हत्या केली. प्राथमिक माहितीनुसार ही घटना काही तरुणांसोबत झालेल्या किरकोळ वादातून घडली. गौरव हा मुळचा अंदुरा (ता. बाळापूर) येथील रहिवासी असून कारंजा येथील जिजामाता महाविद्यालयात बारावीच्या पुढचं शिक्षण घेत होता. शिक्षणासाठी तो कारंजा येथे वास्तव्यास होता. १ डिसेंबरला सकाळी काही मित्रांसोबत फाट्याजवळ असताना अचानक वाद चिघळला आणि संतापलेल्या तरुणांनी त्याच्यावर अमानुष हल्ला केला. या मारहाणीत गौरव घटनास्थळीच ठार झाला. ही माहिती पसरल्याने गावात एकच खळबळ उडाली.

हल्लेचं धक्कादायक कारण...

गौरव गणेश बायस्कार २४ वर्षीय तरुण आज सकाळी १० :३० मित्राच्या भांड्यात मध्यस्थी करण्यासाठी गेला असता तीन ते चार जणांनी त्याला चाकूने भोकसून पोटात आणि छातीवर डाव्या बाजूला सपासप वार करत हत्या केली आहे. दरम्यान गौरवचा यामध्ये जागीच मृत्यू झाला. या प्रकरणात दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. एक फरार आहे. सध्या मृतदेहावर शवविच्छेदन अकोला शासकीय रुग्णालय येथे सुरू आहे.

आरोपी फरार, पोलिसांची त्वरित कारवाई

घटनेची माहिती मिळताच उरळ पोलीस स्टेशनचे निरीक्षक पंकज कांबळे पथकासह घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेत पंचनामा केला आणि  शवविच्छेदनासाठी पाठवला. घटनेच्या नेमक्या कारणांचा तपास सुरू आहे. आरोपी घटनास्थळावरून पळून गेले होते; मात्र लोहारा येथील दोन युवकांनी हत्येत सहभाग असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. जिल्हा पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी प्रकरण गंभीर असल्याचे सांगत तातडीने आरोपींचा शोध घेण्याचे आदेश दिले. त्यांच्या सूचनेनुसार विशेष पथक तयार करण्यात आले. उरळ पोलिसांनी तत्काळ हालचाल करून दोन संशयितांना ताब्यात घेतले असून त्यांची चौकशी सुरू आहे. आणखी कोण सहभागी आहे का, याचा तपासही वेगाने केला जात आहे.

Akola News : निवडणुकीचं वातावरण बिघडलं, उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, लोखंडी पाईपने डोकं फोडलं

नक्की वाचा - Akola News : निवडणुकीचं वातावरण बिघडलं, उमेदवाराच्या पतीवर जीवघेणा हल्ला, लोखंडी पाईपने डोकं फोडलं

परिसरात भीतीचं वातावरण, गावात शोककळा

या निर्घृण हत्येमुळे विद्यार्थीवर्ग आणि स्थानिक नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. घरापासून दूर अभ्यासासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांच्या सुरक्षेवर प्रश्न उपस्थित झाला आहे. गौरव हा शांत स्वभावाचा आणि अभ्यासू असल्याचे गावकरी सांगतात. त्याच्या अकस्मात मृत्यूने अंदुरा गावासह परिसरात शोककळा पसरली आहे. नागरिकांनी आरोपींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे. पोलीस प्रकरणाचा संपूर्ण तपास करत असून पुढील काही तासात अधिक माहिती समोर येण्याची शक्यता आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com