जाहिरात

पूजा खेडकर प्रकरण म्हणजे हिमनगाचं टोक? अपंगत्व प्रमाणपत्राबाबत मोठी बातमी समोर

पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे.

पूजा खेडकर प्रकरण म्हणजे हिमनगाचं टोक? अपंगत्व प्रमाणपत्राबाबत मोठी बातमी समोर
पुणे:

राहुल कुलकर्णी, प्रतिनिधी

कथितरित्या बनावट अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे सनदी सेवेत IAS म्हणून रजू झालेल्या पूजा खेडकर यांच्याबाबतीत विविध कारणांवरून सवाल उपस्थित केले जात आहे. पूजा खेडकर यांनी पिंपरी-चिंचवड पालिकेच्या वायसीएम रुग्णालयातून अपंगत्वाचे प्रमाणपत्र घेतल्याचं समोर आलं आहे. डावा गुडघा सात टक्केवारी कायमस्वरूपी अधू असल्याचं या प्रमाणपत्रात नमूद करण्यात आलं आहे. 24 ऑगस्ट 2022 रोजी हे प्रमाणपत्र वायसीएम रुग्णालयाने पूजा खेडकरांना दिलं होतं. याआधी पूजा खेडकर यांना कमी दिसतं, त्याअनुषंगाने त्या चर्चेत होत्या. अशातच आता डाव्या गुडघ्याच्या अपंगत्वाचं प्रमाणपत्र समोर आलं आहे.

दरम्यान या प्रकरणाला अनुसरून एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. 2015 ते 2023 या नऊ वर्षांमध्येच महाराष्ट्रामध्ये 44 हून अधिक लोकांनी अपंगत्व प्रमाणपत्राच्या आधारे सनदी सेवेत प्रवेश मिळवला आहे. पूजा खेडकर सारखे महाराष्ट्रातून अनेकांनी अशा प्रकारचे प्रमाणपत्र घेऊन सनदी सेवेत दाखल झाल्याचा प्रकार समोर आला आहे. यामध्ये कोणी आयएएस झाले तर कोणी आयआरएस. या अपंगत्वाचे चार प्रकार पडतात. या चार प्रकारात वेगवेगळी प्रमाणपत्र घेऊन गेल्या नऊ वर्षांमध्ये गेल्या 9 वर्षात तब्बल 319 जणं सनदी सेवक झाले. याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. पूजा खेडकर हे हिमनगाचं टोक आहे का, असाही सवाल उपस्थित होत आहे. 

अपंग प्रमाणपत्राचा उपयोग नियुक्तीसाठी नाही तर UPSC परीक्षेवेळी केला जातो. परीक्षेच्या वेळेला अपंग उमेदवारांना विविध सुविधा दिल्या जातात. परंतु नियुक्तीच्या वेळेला अपंग उमेदवारांच्या अपंगत्वाच्या प्रमाणपत्राची पडताळणी केली जाते आणि केवळ त्या पडताळणीच्या निकालावरच त्यांना अपंग उमेदवार म्हणून नियुक्ती दिली जाते. 

यूपीएससी परीक्षेच्या वेळेला अपंग उमेदवारांना विविध सुविधा दिल्या जातात. ज्यामध्ये मोठ्या फॉन्टमध्ये प्रश्नपत्रिका आणि अतिरिक्त वेळ याचा समावेश आहे. अपंग उमेदवारांना स्क्राइब (मदतनीस) देखील उपलब्ध करून दिला जातो.अशा प्रकारे अपंग उमेदवारांना यूपीएससी परीक्षेच्या वेळेला विविध सुविधा दिल्या जातात.

नक्की वाचा - पुण्यात प्रशिक्षणादरम्यान IAS पूजा खेडकर यांचे धक्कादायक प्रकार, महत्त्वाचा अहवाल समोर

IAS किंवा IRS रँकिंग मिळविण्यासाठी अपंग उमेदवारांसाठीचे मुख्य फायदे 
1. आरक्षण आणि कोटा: शारीरिकदृष्ट्या  दिव्यांग उमेदवार UPSC नागरी सेवा परीक्षेत आरक्षण आणि कोट्यासाठी पात्र आहेत. या आरक्षणामुळे त्यांना प्रतिष्ठित IAS आणि IRS सेवांसाठी निवड होण्याची वाजवी संधी मिळते.

2. विशेष राहण्याची सोय: UPSC परीक्षेदरम्यान, शारीरिकदृष्ट्या अक्षम उमेदवारांना मोठ्या फॉन्टच्या प्रश्नपत्रिका, अतिरिक्त वेळ आणि सहायक लेखक/लेखक यासारख्या विशेष सोयी दिल्या जातात.

3. करिअरची प्रगती: IAS किंवा IRS रँक मिळवणे सरकारी प्रशासकीय सेवांमध्ये करिअरच्या विस्तृत संधी मिळते. हे दिव्यांग उमेदवारांना नेतृत्व आणि निर्णय घेण्याची भूमिका घेण्यास परवानगी मिळते.

IAS किंवा IRS रँकिंग अपंग उमेदवारांसाठी अत्यंत फायदेशीर आहे कारण ते त्यांना समान संधी, निवास, करिअर वाढ, आर्थिक सुरक्षा आणि सामाजिक प्रभाव पाडण्याची संधी मिळते.

UPSC नागरी सेवांच्या एकूण रिक्त पदांपैकी 24 पदे शारीरिकदृष्ट्या अपंग (PwD) श्रेणीसाठी राखीव आहेत. हा PwD कोटा पुढील उपश्रेणींमध्ये विभागलेला आहे:

- लोकोमोटर डिसॅबिलिटी आणि सेरेब्रल पाल्सी (LDCP): 8 रिक्त जागा
- अंध/कमी दृष्टी (B/LV): 3 रिक्त जागा  
- श्रवणदोष (HI): 9 रिक्त जागा
- एकाधिक अपंग: 4 रिक्त जागा

UPSC नागरी सेवांच्या एकूण 796 रिक्त पदांपैकी 24 जागा PwD कोट्याअंतर्गत 40% किंवा त्याहून अधिक अपंगत्व असलेल्या उमेदवारांसाठी राखीव आहेत.
 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com