
Hair Care Tips: धकाधकीच्या लाइफस्टाइलमुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याशी संबंधित कित्येक समस्या निर्माण होतात. हाय ब्लड प्रेशर, मधुमेह, लठ्ठपणा यासारख्या विकारांमुळे अनेकजण त्रासलेले आहेत. पण बहुतांश लोक केसगळतीच्या समस्येमुळे हैराण झाले आहेत. महिलांसह पुरुष वर्गही केसगळतीमुळे त्रासलेले आहेत. कित्येक महागड्या प्रोडक्ट्सचा वापर केल्यानंतरही केसगळतीची समस्या काही केल्या कमी होत नाही. तुमचीही हीच अवस्था आहे का? चिंता करू नका. प्रसिद्ध हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने चमत्कारी उपाय सांगितलाय की ज्यामुळे केसगळतीची समस्या रोखली जाण्यास मदत मिळते.
केसांची देखभाल कशी करावी?
हेअर स्टायलिस्ट जावेद हबीबने सांगितलेला उपाय केल्यास केसगळती थांबवण्यास आणि केसांना कित्येक पोषणतत्त्वांचा पुरवठा होण्यास मदत मिळेल. केसांची देखभाल करण्याची ही खास पद्धत आहे. लोक हेअर केअर रुटीन फॉलो करत नाही, यामुळे केसांचे गळणे आणि केस कमकुवत होणे यासारख्या समस्या निर्माण होऊ लागतात.
जावेद हबीबने कोणता उपाय सांगितला?
- हेअर एक्सपर्ट जावेद हबीबने सांगितले की,सर्वप्रथम केस स्वच्छ धुणे आवश्यक आहे.
- केस व्यवस्थित धुतले नाही तर केसगळतीची समस्या निर्माण होऊ शकते.
- प्रदूषण, दुर्गंध-घाणीमुळे केसांचे प्रचंड नुकसान होते.
- सर्वप्रथम केस ओले करा आणि त्यावर तेल लावा.
- तेल लावल्यानंतर मसाज करू नये, पाच ते 10 मिनिटे तेल केसांमध्ये राहू द्यावे.
- पाच ते 10 मिनिटांनंतर सौम्य शॅम्पू किंवा शिकेकाई यासारख्या औषधी वनस्पतींच्या मदतीने केस स्वच्छ धुवावे.
- केसांना कंडिशनर लावणे आवश्यक आहे.
- केसांच्या निरोगी आरोग्यासाठी या तीन स्टेप फॉलो केल्यास केसांचे गळणे कमी होण्यास मदत मिळेल.
एकही केस गळणार नाही
जावेद हबीबने दिलेल्या मुलाखतीत म्हटलं की, नियमित या गोष्टी फॉलो केल्यास केस स्वच्छ राहण्यास मदत मिळेल आणि एकही केस गळणार नाही. म्हणजे केसगळती तसेच कोंड्याची समस्याही निर्माण होणार नाही. तुम्ही देखील केसगळतीच्या समस्येमुळे त्रस्त असाल तर जावेद हबीबने सांगितलेल्या उपाय फॉलो करुन पाहा.
(Disclaimer: NDTV Marathi या माहितीची जबाबदारी घेत नाही. अधिक माहितीसाठी तज्ज्ञ/डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. )
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world