जाहिरात

Crime News: मुंबई हादरली! नामांकित शाळेत 4 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, एका महिला कर्मचाऱ्याला बेड्या

Mumbai Crime Story Minor Girl Abused In School: प्रकार समोर आल्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या मुलाला ‘सुरक्षित’ म्हणून शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा विश्वास या घटनेने पार धुळीस मिळाला आहे.

Crime News: मुंबई हादरली! नामांकित शाळेत 4 वर्षांच्या बालिकेवर लैंगिक अत्याचार, एका महिला कर्मचाऱ्याला बेड्या

मुंबई:  ज्या शाळेला मुंबईची (Mumbai) शान मानले जाते, त्याच शाळेत एका 4 वर्षांच्या निष्पाप मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याच्या घटनेने संपूर्ण मुंबई हादरली आहे. या गंभीर प्रकरणात पोलिसांनी तातडीने कारवाई करत एका महिला कर्मचाऱ्याला बेड्या ठोकल्या आहेत. हा प्रकार समोर आल्यानंतर शाळा प्रशासन आणि पालकांमध्ये मोठा संघर्ष पेटण्याची चिन्हे दिसत आहेत. आपल्या मुलाला ‘सुरक्षित' म्हणून शाळेत पाठवणाऱ्या पालकांचा विश्वास या घटनेने पार धुळीस मिळाला आहे. (Mumbai Crime Minor Girl Abused In School)

काय आहे संपूर्ण प्रकरण?

सोमवारी (16 सप्टेंबर) सकाळी मुलीची आजी तिला शाळेत सोडून गेली. दुपारी मुलगी घरी परतल्यावर तिला अस्वस्थ वाटू लागले. तिने वेदना होत असल्याची तक्रार करताच, कुटुंबियांनी कोणतीही वेळ न घालवता तिला वैद्यकीय तपासणीसाठी नेले. डॉक्टरांच्या रिपोर्टमध्ये तिच्यावर लैंगिक अत्याचार (Physical Abused) झाल्याचे स्पष्ट झाले, ज्यामुळे कुटुंबियांवर आभाळ कोसळले. यानंतर संतप्त कुटुंबियांनी शाळेवर थेट हल्लाबोल केला आणि गोरेगाव पोलिसांत तक्रार दाखल केली.

Chhatrapati Sambhajinagar : रात्रभर गप्पागोष्टी करत पेगवर पेग रिचवले; अचानक गोळीबार, मित्रानेच मित्राला संपवलं

कुटुंबियांच्या तक्रारीची दखल घेत गोरेगाव पोलिसांनी लगेच पॉक्सो कायद्याखाली गुन्हा दाखल केला. पोलिसांनी तातडीने तपास सुरू केला आणि शाळेच्या एका महिला कर्मचाऱ्याला अटक केली. मात्र, तिचा नेमका सहभाग काय आहे, हे अद्याप स्पष्ट झाले नाही. पोलिसांनी आता शाळेतील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले असून, त्याची कसून तपासणी सुरू आहे.

 दरम्यान, या फुटेजमधून या घटनेतील सत्य समोर येईल, अशी आशा आहे. पोलिसांनी शाळेतील अन्य तीन महिला सहायक कर्मचाऱ्यांनाही चौकशीसाठी बोलावले आहे. ही घटना एका व्यक्तीने केली की, यात आणखी काहीजण सहभागी आहेत, याचा पोलीस तपास करत आहेत. या घटनेने नागरिकांमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. (Crime Story In Marathi)

नक्की वाचा - Virar News: गाईंना छोट्याशा कारमध्ये कोंबलं; गावकऱ्यांच्या एन्ट्रीमुळे चालकाचं दुष्कृत्य उघड, धक्कादायक प्रकार

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com