जाहिरात

Vasai Crime: अपहरण, अत्याचार, हत्या.. 18 वर्षांनी आरोपी गजाआड; 'क्राईम ब्रँच युनिट 2'ची धडाकेबाज कारवाई

उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.

Vasai Crime: अपहरण, अत्याचार, हत्या.. 18 वर्षांनी आरोपी गजाआड;  'क्राईम ब्रँच युनिट 2'ची धडाकेबाज कारवाई

मनोज सातवी, वसई:

 Vasai Crime: वसईच्या माणिकपूर पोलीस ठाण्यात २००७ साली दाखल झालेल्या एका भयंकर गुन्ह्यातील आरोपीला तब्बल १८ वर्षानंतर उत्तरप्रदेशातून अटक करण्यात  गुन्हे प्रकटीकरण कक्ष- २ च्या पथकाला यश मिळालं आहे. एका ५ वर्षाच्या मुलीचे अपहरण करून तिचा बलात्कार आणि निघृण खून करुन हा आरोपी तेव्हापासून फरार होता. नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा असे या नराधमाचे नाव आहे. 

5 वर्षाच्या मुलीचे अपहरण, हत्या...

वसई पूर्वच्या सातिवाली येथील अवधराम चाळीत  राहणाऱ्या फिर्यादी बाबुला जगईप्रसाद गौतम यांच्या पाच वर्षीय  चिमुकलीचे याच परिसरात राहणारा नराधम नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा याने चॉकलेट देण्याचे आमिष दाखवून अपहरण केलं, त्यानंतर तिच्यावर बलात्कार केला, हा नराधम एवढ्यावरच थांबला नाही, तर तिला निर्दयीपणे मारहाण करून तिचा गळा आवळुन जिवे ठार  मारले होते.

Sindhudurg News : मोबाईलमधील रहस्यामुळे प्रेमकथेची शोकांतिका,तरुण जोडप्याच्या निर्णयानं सिंधुदुर्गात खळबळ

याप्रकरणी दिनांक ०१/०४/२००७ रोजी दिलेल्या फिर्यादी वरुन माणिकपूर पोलीस स्टेशन गु. रजि.नं. १२३/२००७ भादवि कलम ३०२, ३६३, ३७६ प्रमाणे सदरचा गुन्हा नोंद करण्यात आला होता. मात्र तेव्हापासून हा नराधम पोलिसांना गुंगारा देत फरार होता.  मिरा भाईंदर, वसई विरार पोलीस आयुक्तालयातील पोलीस ठाण्यांच्या अधिकार क्षेत्रात घडलेल्या आणि अशा उघडकीस न आलेल्या खुनाच्या गुन्हयाचा समांतर तपास करुन गुन्हयाची उकल करण्याबाबत पोलीस आयुक्त निकेत कौशिक यांनी आदेश दिले होते.

18 वर्षांनी आरोपी गजाआड...

 त्यानुसार वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली १८ वर्षांनंतर या अमानुष गुन्ह्याचा उलगडा करण्यात वसई गुन्हे प्रकटीकरण कक्ष–२ च्या पथकाला मोठे यश मिळाले आहे. आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्मा हा उत्तरप्रदेशातील मूळ गावी लपून राहत असल्याचे पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहिती द्वारे निष्पन्न झाले होते. त्यानंतर गुन्हे प्रकटीकरण कक्ष दोनच्या पथकाने अतिशय कौशल्यपूर्ण तपास करून उत्तरप्रदेशातील सिध्दार्थनगर जिल्ह्यातील खरदौरी गावातून दिनांक १० डिसेंबर २०२५ रोजी  आरोपी नंदलाल उर्फ नंदू विश्वकर्माच्या मुसक्या आवळल्या.

( नक्की वाचा : Badlapur : बदलापूरच्या काँग्रेस नेत्याची हत्या झाल्याचं 3 वर्षांनी उघड, नवऱ्यानं घरात आणला होता साप आणि.... )

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई वसई गुन्हे शाखा कक्ष २ चे पोलीस निरीक्षक अविराज कुराडे, सहायक पोलीस निरीक्षक सोपान पाटील, पोलीस उप निरीक्षक संतोष घाडगे, अजित गिते, सहायक फौजदार संजय नचले, मुकेश पवार, रविंद्र पवार, मनोज मोरे, चंदन मोरे, पोलीस हवालदार प्रफुल्ल पाटील, प्रशांतकुमार ठाकुर, सचिन पाटील, जगदिश गोवारी, दादा आडके, राहुल करें, दिलदार शेख, अंमलदार अनिल साबळे, अक्षय बांगर, रामेश्वर केकान, सर्व नेम. गुन्हे शाखा कक्ष २ वसई तसेच सायबर पोलीस ठाण्याचे सहायक फौजदार संतोष चव्हाण यांनी उत्कृष्टपणे ही कारवाई पार पाडली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com