राकेश गुडेकर, प्रतिनिधी
Ratnagiri Crime News : रत्नागिरी शहरा जवळच्या कुवारबाव साईनगर येथे धक्कादायक घटना घडली.एका तरुणावर कोयत्याने सपासप वार करून त्याची हत्या करण्यात आली.सूरज राजाराम झोरे असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे.सूरजला जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं. परंतु,सूरजचा आज उपचारादरम्यान मृत्यू झाला.याप्रकरणी पोलिसांनी तीन संशयितांना ताब्यात घेतलं असून पुढील तपास सरू आहे.सोहम एकनाथ म्हात्रे,अभिषेक देवानंद राठोड,नजीबूल शेख उर्फ सोनू अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
.हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट
मिळालेल्या माहितीनुसार, कोयत्याने सपासप वार करुन सूरज राजाराम झोरे या तरुणाची हत्या करण्यात आली.हत्येमागचं कारण अद्याप अस्पष्ट आहे.सूरज हा मूळचा संगमेश्वरमधील नायरी येथील रहिवासी होता. तो सध्या मुंबई येथील विरारला राहायचा. काही कामानिमित्त सूरज त्याच्या मूळगावी आला होता.याप्रकरणी तीन संशयितांना ताब्यात घेण्यात आलं आहे.
नक्की वाचा >> Pune News: पुणेकरांनो अलर्ट राहा, 'या' 4 ठिकाणी पावसाने घातला धुमाकूळ, अनेक ठिकाणी वाहतूक कोंडी
सूरजच्या मानेवर, हातांवर कोयत्याने केले वार
या घटनेची माहिती मिळताच सूरज झोरेच्या बहिणीने शहर पोलीस ठाण्यात तक्रार दिली. दरम्यान, गुरुवारी 21 मे रोजी रात्री 9.30 ते 10.53 दरम्यान साईनगर सात बंगल्याच्या मागे संशयित आरोपींनी मिळून सूरजच्या मानेवर, हातांवर कोयत्याने वार केला. गंभीर झालेल्या सूरजवर जिल्हा शासकिय रुग्णालयातील अतिदक्षता विभागात उपचार सुरु होते.परंतु, आज सूरजचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याप्रकरणी पोलीस उपनिरीक्षक सतीश शिंदे अधिक तपास करत आहेत.
नक्की वाचा >> Good News: 'या' तारखेपासून रुग्णवाहिकेत मिळणार 'या' नव्या सुविधा, काय आहेत नियम? वाचा सर्व डिटेल्स
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world