जाहिरात

प्रेमात धोका? 24 वर्षीय तरूणीने उचललं टोकाचं पाऊल

घरात कमवती लेक अचाकन अशी गेल्याने तिच्या घरच्यांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे.

प्रेमात धोका? 24 वर्षीय तरूणीने उचललं टोकाचं पाऊल
लातूर:

लातूरच्या आर्वी परिसरात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. एका 24 वर्षीय तरूणीने गळफास घेवून आत्महत्या केली आहे. प्रियकराने लग्नास नकार दिल्याने तिनेहे टोकाचे पाऊल उललचे. घरात कमवती लेक अचाकन अशी गेल्याने तिच्या घरच्यांवर दुखा:चा डोंगर कोसळला आहे. कोणी स्वप्नातही असा विचार केला नव्हता की ती येवढं टोकाचं पाऊल उचलेल. तिच्या घरच्यांना तीने आत्महत्या केली आहे यावर विश्वासच बसत नाही. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

ऐश्वर्या चव्हाण असं या तरूणीचं नाव आहे. ती पेशाने नर्स होती. ती लातूर मधल्या एका दवाखान्यात नर्सम्हणून काम करत होती. त्याच वेळी लॅब टेक्निशियन असलेल्या अविष्कार माने या तरूणा बरोबर तिची ओळख झाली. त्यांच्यात चांगली मैत्रीही झाली. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. दोघांनीही लग्न करण्याचेही ठरवले होते. गेल्या काही महिने त्या दोघांमध्ये सर्व काही ठिक चाललं होतं. 

ट्रेंडिंग बातमी -   प्रेमासाठी पंजाबवरून रत्नागिरीत आली, सत्य समोर येताच हादरून गेली, नक्की काय घडलं?

लग्न करणार आहे असं सांगून अविष्कारने तिला फसवले असा आरोप तिच्या कुटुंबीयानी केला आहे. लग्न करावे यासाठी तिने तगादा लावला होता. पण तो वारंवार लग्नाचा विषय काढला की बोलणे टाळत होता. अखेर त्याने लग्न करण्यास नकार दिला. त्यामुळे ऐश्वर्याला मानसिक धक्का बसला. हा नकार तिला सहन झाला नाही. नैराश्यातून तिने राहात्या घरी गळफास घेवून आत्महत्या केली.

ट्रेंडिंग बातमी - 'तुमच्या आजोबांना विचारा किती कुटुंब...' विखे पाटील रोहित पवारांवर भडकले 

ऐश्वर्या ही आत्महत्या करण्या पूर्वी अविष्कार बरोबर बोलत होती असं तिच्या भावाने सांगितले. त्याच वेळी दोघांमध्ये खटकेही उडाले. त्यामुळे ती अस्वस्थ होती. त्यात तिने आत्महत्ये सारखं टोकाचं पाऊल उचललं. जेव्हा तिच्या रूमचा दरवाजा उघडला गेला तेव्हा तिचा मृतदेह लटकलेला दिसला. त्यानंतर संबंधित तरुणाच्या विरोधात लातूरच्या एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्या आला आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com