Pune News : बोगस डॉक्टरचा पर्दाफाश, नागरिकांमध्ये भीतीचं सावट, पुण्यात कुठे सुरु होता संतापजनक प्रकार?

दौंड तालुक्यातील कासुर्डी परिसरात बोगस डॉक्टर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांनी आखाडेवस्ती येथे छापा टाकत राजस्थान येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Pune Daund Fake Doctor Case
Pune:

देवा राखुंडे, प्रतिनिधी 

Pune Daund Crime News Today : दौंड तालुक्यातील कासुर्डी परिसरात बोगस डॉक्टर असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. यवत पोलिसांनी आखाडेवस्ती येथे छापा टाकत राजस्थान येथील एका व्यक्तीवर गुन्हा दाखल केला आहे. संबंधित आरोपीकडे कोणतीही वैद्यकीय पदवी, महाराष्ट्र मेडिकल काऊन्सिल नोंदणी किंवा क्लिनिक चालविण्याचा परवाना नसतानाही तो ॲलोपॅथी उपचार करत असल्याचे समोर आले आहे. 

6 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त

ओमप्रकाश बन्सीलाल स्वर्णकर असं तोतया डॉक्टरचं नाव असून तो मूळचा राजस्थानमधील असल्याची माहिती आहे. पोलिसांनी क्लिनिकमधून मोठ्या प्रमाणात औषधे इंजेक्शन रोख रक्कम आणि चारचाकी वाहन असा जवळपास 6 लाख 54 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी यवत पोलीस स्टेशनमध्ये फसवणूक वैद्यकीय व्यवसाय अधिनियमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

Advertisement

नक्की वाचा >> Akola News: 'या' पतसंस्थेत 16 कोटी 79 लाखांचा गबन, अध्यक्ष आणि CEO अटकेत, 182 गुंतवणूकदार अडचणीत

प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकला

मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील कासुर्डी परिसरात आखाडेवस्ती या ठिकाणी एक व्यक्ती डॉक्टरच्या नावाखाली रुग्णांवर उपचार करत असल्याची माहिती प्रशासनाला मिळाली होती. त्यानुसार प्रशासनाने या ठिकाणी छापा टाकला. जो स्वतःला डॉक्टर म्हणत होता त्याच्याकडे काही आवश्यक कागदपत्रांची मागणी केली तपासणी केली. मात्र वैद्यकीय सेवेसाठी आवश्यक असणारी कोणतीही वैद्यकीय परवाने किंवा आवश्यक कागदपत्रे आढळून आले नाहीत. त्यावरून यवत पोलिसांनी विविध कलमान्वये संबंधित डॉक्टरच्या विरोधात गुन्हा दाखल केला असून या प्रकरणाचा पुढील तपास केला जात आहे.

नक्की वाचा >> Mumbai News: दादर पश्चिम-दादर पूर्वेला जोडणारा एल्फिन्स्टन उड्डाणपूल वाहतुकीसाठी बंद, पर्यायी मार्ग कोणते?