जाहिरात

Abu Salem: अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम जेल बाहेर येणार? कोर्टात असं काय घडलं? सरकारची भूमीका काय?

तर दोन दिवसात आझमगढला जाऊन परत येणे शक्य नसल्याचं सालेमच्या वकिलांनी केलं स्पष्ट आहे.

Abu Salem: अंडरवर्ल्ड डॉन अबू सालेम जेल बाहेर येणार? कोर्टात असं काय घडलं? सरकारची भूमीका काय?
  • अबू सालेमने १४ दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मागितला असून राज्य सरकारने त्याला विरोध दर्शविला आहे
  • राज्य सरकारने अबू सालेमला आंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्याने पॅरोल देण्यास नकार दिला आहे
  • दोन दिवसांचा पॅरोल मंजूर झाल्यास अबू सालेम पोलीस संरक्षणात बाहेर येण्याची शक्यता आहे
आमच्या एआय सारांशामुळे मदत मिळाली?
आम्हाला नक्की कळवा.
मुंबई:

अंडरवर्ल्ड गँगस्टर अबू सालेमला जेलमधून बाहेर येण्याचे वेध लागले आहेत. 1993 बॉम्ब स्फोटाचा आरोपी असलेला अबू सालेम गेल्या 20 वर्षापासून जेलची हवा खात आहे. सध्या त्याने 14 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल मागितला आहे. तसा त्याने कोर्टात अर्ज ही केला होता. मात्र हा पॅरोल देण्यास राज्य सरकारने विरोध केला आहे. सालेम अंतरराष्ट्रीय गुन्हेगार असल्याने त्याला एवढ्या दिवसांचा पॅरोल देण शक्य नाही अशी भूमीका राज्य सरकारने घेतली आहे. 

असं असलं तरी अबू सालेमला पोलीस संरक्षणात केवळ दोनच दिवसांचा पॅरोल मिळू शकेल. मात्र हे करत असताना त्याला पोलीस संरक्षणाचा खर्च स्वत: करावा लागेल अशी भूमीका ही राज्य सरकारची आहे. त्यामुळे दोन दिवसासाठी का होईना अबू सालेम जेलच्या बाहेर येण्याची शक्यता निर्माण झाली आहे. 14 दिवसांचा आपत्कालीन पॅरोल देण्यासदर्भातील चिंतेबाबत शपथपत्राद्वारे उत्तर देण्याचे राज्य सरकारला मुंबई उच्च न्यायालयाचे आदेश दिले आहेत. 

नक्की वाचा - Pune News: पुणे होणार'बोगद्यांचे शहर'! कात्रजचा घाट विसरा, जमिनी खालून प्रवास करा, 56 बोगद्यांचा मेगा प्लॅन

तर दोन दिवसात आझमगढला जाऊन परत येणे शक्य नसल्याचं सालेमच्या वकिलांनी केलं स्पष्ट आहे. 1993 च्या मुंबई स्फोटाप्रकरणी अटक करण्यात आलेला सालेम 20 वर्षांपासून कारागृहात बंद आहे. तो आपत्कालीन पॅरोल मागत असल्याचा त्याच्या वकिलांचा युक्तिवाद आहे. नोव्हेंबर महिन्यात त्याच्या मोठ्या भावाच्या मृत्यू झाला होता. त्यानंतर त्याच्या अंत्यसंस्काराला उपस्थित राहण्यासाठी तसेच उर्वरित विधी करण्यासाठी सालेमने कारागृहात अधिकाऱ्यांकडे 14 दिवसांच्या पॅरोलची मागणी केली होती. ही मागणी फेटाळल्यानंतर सालेमने मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली होती. 

नक्की वाचा - Pune News: पक्षाचे झेंडे सोडले हातात दांडके घेतले, भाजप कार्यकर्त्यांनी प्रचार संपताच असे का केले?

यावेळी झालेल्या सुनावणीत राज्य सरकारने त्याला 14 दिवसांचा पॅरोल देण्यासाठी नकार दिला आहे. त्यासाठी सुरक्षेचे कारण ही देण्यात आले आहे. शिवाय तो एक आंतरराष्ट्रीय दहशतवादी असल्याचं ही सरकारने स्पष्ट केलं आहे. त्यामुळे 20 वर्षानंतर जेल बाहेर येणाचं सालेमचं स्वप्न भंग होण्याची दाट शक्यता आहे. मात्र दोन दिवसाची पॅरोल मंजूर झाल्यास तो बाहेर येवू शकतो. त्याला सरकारने हिरवा कंदील दिला आहे. तरी ही शेवटी न्यायालय काय निर्णय देते याकडेच सर्वांचे लक्ष लागले आहे. 

नक्की वाचा - Ajit Pawar : '100 कोटी पार्टीला, 10 कोटी अधिकाऱ्यांना', अजित पवारांचा भाजपावर सिंचन घोटाळ्याचा मोठा आरोप!

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com