Gulshan Kumar murder case : ऑगस्ट १९९७ मध्ये टी सिरीजचे मालक गुलशन कुमार यांची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. गुलशन कुमार मंदिरातून घरी परतत होते. त्यावेळी अबू सालेमचा शूटर अब्दुल मर्चंट याने गुलशन कुमार यांच्यावर गोळीबार केला. दहशत निर्माण करण्यासाठी शूटरने गुलशन कुमारवर १६ राऊंड फायरिंग केलं होतं. यानंतर त्याने अबू सालेमला फोन केला आणि दहा मिनिटांपर्यंत गुलशन कुमारच्या कळवळण्याचा आवाज ऐकवत होता, असं सांगितलं जात.
गुलशन कुमार यांची हत्या करणारा शूटर अब्दुल मर्चंट याचा कारागृहातच मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. छत्रपती संभाजीनगरच्या हर्सूल कारागृहात तो शिक्षा भोगत होता. आज गुरुवारी सकाळी त्याचा मृत्यू झाला. हर्सूल कारागृहात त्याला हृदयविकाराचा झटका आल्याची माहिती आहे. यानंतर त्याला घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. येथेच त्याचा अंत झाला. गुलशन कुमार हत्याकांडातील गुन्ह्यात शूटर अब्दुल मर्चंट जन्मठेपेची शिक्षा भोगत होता.
नक्की वाचा - Naigaon News : सलूनमध्ये वाजलं काश्मीरसंदर्भातील धक्कादायक गाणं; नायगाव परिसरात तणावाची स्थिती
गुलशन कुमार यांची हत्या का केली?
कधी ज्यूसचं दुकान थाटणारे गुलशन कुमार मेहनतीने कॅसेट किंग बनले होते. गुलशन कुमार यांचं यश दिवसागणिक वाढत होतं. दुसरीकडे त्यांच्या शत्रूंची संख्याही वाढत होती. एस. हुसैन जैदी यांनी त्यांचं पुस्तर माय नेट इज अबू सलेममध्ये लिहिलं की, अबू सलेमने सिंगर गुलशन कुमार यांच्याकडे दहा कोटींची मागणी केली होती. मात्र गुलशन कुमार यांनी पैसे देण्यास नकार दिला. इतके पैशात मी वैष्णो देवी मंदिरात भंडारा आयोजित करेन असं ते म्हणाले होते. ज्यानंतर १२ ऑगस्ट १९९७ मध्ये मुंबईतील अंधेरीच्या जितेश्वर महादेव मंदिराबाहेर १६ गोळ्या झाडून गुलशन कुमारची हत्या केली.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
