1993 च्या मुंबई बॉम्बस्फोटातील आरोपी कुख्यात गँगस्टर अबू सालेम ( Gangster Abu Salem) सध्या नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहात शिक्षा भोगत असून आज पहाटेच्या सुमारास कारागृह प्रशासन, एटीएस आणि पोलीसांच्या कडेकोट बंदोबस्तात त्याला दिल्लीला नेण्यात आले आले आहे. एका खटल्यासंबंधित न्यायालयाची तारीख असल्याकारणाने त्याला दिल्लीला नेण्यात आल्याची माहिती आहे.
अबू सालेम याला घेऊन जाताना कुठलाही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी नाशिक पोलिसांकडून याबाबत कमालीची गुप्तता पाळण्यात आली होती. तुरुंगाबाहेरील काही किलोमीटरच्या परिसराचा त्यांनी ताबा घेतला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनूसार एका खटल्यासंदर्भात न्यायालयाच्या तारखेसाठी सालेमला नेले जात आहे.
नक्की वाचा - अंडरवर्ल्ड डॉन अरुण गवळीला सर्वोच्च न्यायालयाकडून दिलासा नाहीच!
1993 साली मुंबईत झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात अबू सालेम हा आरोपी आहे. त्याला 2005 साली पोर्तुगालमधून भारतात आणण्यात आले आणि तेव्हापासून नवी मुंबईच्या तळोजा कारागृहात त्याला ठेवण्यात आले होते. मात्र हे कारागृह सुरक्षित नसल्याने तसेच काही बांधकाम करण्याचे असल्याने काही दिवसांपूर्वीच सालेमला नाशिकला हलवण्यात आलं होतं. नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सर्वाधिक सुरक्षित मानल्या जाणाऱ्या अंडासेलमध्ये सध्या त्याचा मुक्काम आहे. नाशिकमधून त्याला दिल्लीला नेण्यात आलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world