जाहिरात

Pune News : स्वप्न पूर्तीसाठी पुणे मेट्रोचा 'असा' वापर, लग्नापूर्वी जोडप्यावर कारवाई; Video Viral

Pune Metro Pre Wedding PhotoShoot : पुण्यात वेगळेपणा करण्याच्या नादात एका जोडप्याला कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. 

Pune News : स्वप्न पूर्तीसाठी पुणे मेट्रोचा 'असा' वापर, लग्नापूर्वी जोडप्यावर कारवाई; Video Viral

रेवती हिंगवे, प्रतिनिधी

Pune Metro Pre Wedding PhotoShoot : सध्या लग्नाचा ट्रेंड सुरू आहे. तुळशीचं लग्न झाल्यानंतर लग्नाचे मुहूर्त सुरू होतात. लग्न म्हटलं म्हणजे प्री-वेडिंग फोटोशूट आलंच. प्री-वेडिंग शूटसाठी विविध कल्पना लढवल्या जातात. दरम्यान पुण्यात वेगळेपणा करण्याच्या नादात एका जोडप्याला कारवाईला सामोरं जावं लागलं आहे. 

पुण्यातील एक प्री-वेडिंग फोटो शूट शनिवारवाडा नाही, सिंहगडही नाही तर थेट पुणे मेट्रो स्टेशनवर करण्यात आलं. स्टेशनवर उद्घोषणा केल्यानंतरही या जोडप्याने फोटो शूट थांबवलं नाही. दरम्यान त्यांच्यावर कारवाईची कुऱ्हाड चालविण्यात आली.  

नेमकं काय घडलं? 

पुणे मेट्रोमध्ये प्री-वेडिंग फोटोशूट करण्यात आलं होतं. जोडप्याने याची परवानगीही घेतली नव्हती. स्टेशनवर फोटो शूट न करण्याची उद्घोषणा केल्यानंतरही फोटोग्राफर शूट करीत होता. दरम्यान हाच निष्काळजीपणा त्यांना भोवला आहे. पुणे शहरातील विविध मेट्रो स्टेशन तसेच मेट्रो ट्रेनमध्ये हे फोटोशूट करण्यात आलं होतं. जोडप्याला आणि  फोटोग्राफरला हटकून देखील ते फोटोशूट करीत होते. जोडप्याच्या प्री वेडिंगचे फोटो जबरदस्त आले असले तरी परवानगी न घेता शूट केल्याने मेट्रोकडून दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com