जाहिरात

Diwali 2025 : दिवाळीत आरोग्याशी खेळ, FDA कडून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

दिवाळीनिमित्ताने खरेदी करावयाची असल्यास नागरिकांनी अधिक लक्ष द्यावे. सणासुदीच्या काळात अन्नातील भेसळीबाबत शंका आल्यास त्यांनी 1800222365 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Diwali 2025 : दिवाळीत आरोग्याशी खेळ, FDA कडून 2 कोटींचे खाद्यपदार्थ जप्त

Diwali 2025 : दिवाळीत खाद्यपदार्थांमध्ये भेसळ (Adulteration in food during Diwali) होण्याचं प्रमाण वाढतं. या दिवसात मोठी खरेदी केली जाते. यामध्ये नागरिकांची फसवणूक होत असल्याचं समोर आलं आहे. खाद्यपदार्थांमध्ये होणारी भेसळ रोखण्यासाठी अन्न आणि औषध प्रशासनाकडून कारवाई केली जात आहे. याअंतर्गत राज्यभरातून तब्बल दोन कोटींचा साठा जप्त केला असल्याची माहिती आहे. 

राज्यभरातील अन्न आणि  औषध प्रशासनाच्यावतीने तपासणी मोहीम राबवली जात आहे. त्याअंतर्गत 1 कोटी 97 लाख 93 हजार 42 रुपये किमतीचा भेसळयुक्त साठा जप्त करण्यात आला आहे. यामध्ये खवा, गायीचं तूप, खाद्यतेल, दूध, पनीर, बटर, वनस्पती तूप आणि भगरीमध्ये भेसळ आढळली आहे. त्यामुळे दिवाळीनिमित्ताने खरेदी करावयाची असल्यास नागरिकांनी अधिक लक्ष द्यावे. सणासुदीच्या काळात अन्नातील भेसळीबाबत शंका आल्यास त्यांनी 1800222365 या क्रमांकावर संपर्क साधावा. 

Flipkart Big Bang Diwali Sale : दिवाळीतील सर्वात मोठा सेल, टॉप कंपन्यांचे मोबाइल 9 हजारांपर्यंत स्वस्त

नक्की वाचा - Flipkart Big Bang Diwali Sale : दिवाळीतील सर्वात मोठा सेल, टॉप कंपन्यांचे मोबाइल 9 हजारांपर्यंत स्वस्त

अन्नातील भेसळीमुळे नागरिकांच्या आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतात. त्यामुळे सणासुदीच्या काळात कोणत्याही खाद्यपदार्थाची खरेदी करावयाची असल्याने उत्पादकाचं नाव, दिनांक, एफएसएसएआय परवाना क्रमांक आणि शुद्धतेची खात्री करुन घेणं आवश्यक आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com