
योगेश शिरसाट, अकोला
Akola Crime : अकोला जिल्ह्यात एक धक्कादायक घटना समोर आली आहे. शेतातून घरी येत असताना बारावी वर्गात शिकणाऱ्या एका 17 वर्षीय अल्पवयीन मुलाचा नाल्याला आलेल्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने दुर्दैवी मृत्यू झाला आहे. ही घटना अकोल्याच्या तेल्हारा तालुक्यातील उमरखेड पंचगव्हाण शिवारातील घडली आहे.
काही दिवसापूर्वी दहिगाव अवताडे गावात विनायक अवताडे या 80 वर्षीय अल्पभूधारक शेतकऱ्याचा शेतातील कामे उरकून घरी येत असताना आलेला नाल्याला आलेल्या पुरामुळे मृत्यू झाला होता. दरम्यान एकाच आठवड्यात पुन्हा दुसरी घटना समोर आली. अचानक मुसळधार पावसामुळे उमरखेड पंचगव्हाण शेत शिवारातील लेंडी नाल्याला अचानक पूर आला आणि बारावी शिकणाऱ्या वैभवचा दुर्दैवी मृत्यू झाला.
या दरम्यान, 17 वर्षीय वैभव मनोज गवार गुरु हा त्याच्या शेतात काका सोबत फेरफटका मारण्यासाठी गेला होता. मात्र शेतातून येत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला. यातच दुचाकीने ते घराकडे निघाले. लेंडी नाल्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी नाल्याच्या वरून वाहत होतं. यावेळी पाण्यातून दुचाकी काढत असताना दुचाकी घसरली आणि दुचाकीसह दोघे वाहू लागले. माजी सैनिक असलेल्या काकांनी धाडस करून पाण्यात पोहून स्वतः फांदीला धरून जीव वाचवला. मात्र त्यांचा पुतण्या अर्थात वैभव हा बारावी वर्ग शिकणारा या लेंडी नाल्याच्या पुराच्या पाण्यात वाहून गेल्याने त्याचा दुर्दैव मृत्यू झाला आहे.
नक्की वाचा - Pune Crime : बॉयफ्रेंडला अडकवायला गेली अन् स्वत:च फसली; कोंडवा फेक रेप प्रकरणात पोलिसांची मोठी कारवाई
वैभवसोबत नेमकं काय घडलं?
वैभव हा शेत गावालगतच काही अंतरावर होते. त्यामुळे तो आणि काकासोबतच शेतात पाहणी करत असताना अचानक मुसळधार पाऊस सुरू झाला आणि याच वेळी ही दुर्दैवी घटना घडली. दरम्यान मनोज नामदेव गवारगुरु अल्पभूधारक शेतकरी असून यांच्याकडे ३ एकर शेती आहे तर त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी आहेत. तर वैभव हा एकुलता एक मुलगा होता. त्यांच्या जाण्याने गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world