Akola Crime: जिवलग मित्रच बनला वैरी! दारुच्या नशेत घात केला, अकोल्यात खळबळ

पवनच्या घरासमोर गोंधळ घालून शिवीगाळ करू लागला.. लाभोपाठोपाठ शिव्यांचा वर्षाव पोचू न शकल्याने पवनचा आता संयम सुटला.. आणि दोघा मित्रांमध्ये वाद झाला वादातून हाणामारी झाली..

जाहिरात
Read Time: 2 mins

योगेश  शिरसाट, अकोला: अकोला जिल्ह्यात दिवसेंदिवस गुन्ह्यांचे प्रमाण वाढले असून गुंडगिरी बोकाळली आहे. एकापाठोपाठ एक हत्याकांडाच्या घटना अकोल्यात घडताना समोर येत आहे.. दरम्यान हत्याकांड सत्र सुरूच आहे. दारूच्या नशेत पुन्हा एक जीव गमावल्याची घटना जुने शहरात पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे. जुने शहरात शिवीगाळातून सुरुवात होऊन थेट डोक्यात दगड घालून ही हत्या करण्यात आली असून आरोपीस पोलिसांनी अटक केली आहे. काही दिवसांपूर्वी दारुमुळे अकोल्यातील काकानें पुतण्याची हत्या दगडाने ठेचून केली होती. आता पुन्हा एकदा जुने शहरात शेजारीच  राहणाऱ्या व्यक्तीचा या कहाणीत  शुल्लक कारणावरून वाद होऊन  शेवट झाला आहे. 

Navi Mumbai Crime: मुलीवरुन चिडवल्याचा राग, जिगरी मित्रानेच दोस्ताला संपवलं, अल्पवयीन मुलाने थरार पाहिला अन्..

प्रकाश पप्पू जोसे आणि पवन विलास मोरे हे दोघेही एकमेकांच्या घरा शेजारी राहणारे आणि कुठलीही काम सोबत करणारे दोघेही मित्र..आणि वेळोवेळी एकत्र बसून दारू पिणारे असे मित्र होते.. मात्र प्रकाश दारू झाली की तो पवन शिवीगाळ करायचा... हे नेहमीच असायचं याचीच  पुनरावृत्ती आज शनिवारी मध्यरात्री झाली.. प्रकाश पुन्हा एकदा दारू पिऊन आला आणि दारूच्या नशेत पवनच्या घरासमोर गोंधळ घालून शिवीगाळ करू लागला.. लाभोपाठोपाठ शिव्यांचा वर्षाव पचवू न शकल्याने पवनचा आता संयम सुटला.. आणि दोघा मित्रांमध्ये वाद झाला वादातून हाणामारी झाली..

अशातच झालेल्या वादातून पवन ने जवळच पडलेला मोठा दगड उचलून थेट प्रकाशच्या डोक्यात घातला. प्रकाश रक्ताच्या थारोळात कोसळला आणि रक्तरंजित होऊन घटनास्थळी जागीच त्याचा मृत्यू झाला. परिसरातील काही नागरिक पहाटे पाच वाजता उठले आणि मृतदेह पाहतच त्यांनी त्वरित जुने शहर पोलिसांना माहिती दिली.. या दरम्यान पोलीस अधीक्षक अर्चित चांडक, अप्पर पोलीस अधीक्षक अभय डोंगरे आणि उपविभागीय शहर पोलीस अधिकारी सतीश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनात आणि ठाणेदार नितीन लेव्हरकर  यांच्या नेतृत्वाखाली पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले.. काही वेळातच आपणच खून केला याची भनक पोलिसांना लागली असे समजता क्षणीच पवन मोरे पळून जाण्याच्या तयारीत होता.

(नक्की वाचा: तोंडात मधमाशी गेल्याने कसा झाला मृत्यू? अशा प्रसंगी स्वत:चा बचाव कसा कराल?)

दरम्यान पोलिसांनी वेळीच पवन मोरे'ला बेड्या ठोकून अटक करण्यात आली..दरम्यान ही कारवाई जुने शहर पोलीस स्टेशनचे ठाणेदार नितीन लेव्हरकर यांच्या मार्गदर्शनात पोलीस उपनिरीक्षक रवींद्र करणकार आणि  पंकज उपाध्याय, श्रीकांत पवार, सागर शिरसाट आणि पवन डांबलकर यांच्यासह इतर पोलिसांनी सहकार्य केले.. एकंदरीत अकोला जिल्ह्यात वाढत्या खुणांच्या घटना ह्या दारूच मुख्य कारण बनत असल्याने अवैध दारूवर कठोर कारवाईची मागणी आता अधिक तीव्र होत असून पोलीस अधीक्षकांनी यावर अंकुश लावावा अशी मागणी होत आहे.

Advertisement
Topics mentioned in this article