राहुल बाघ, प्रतिनिधी
Nashik Crime News Today : नाशिक जिल्हा परिषदेतून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. जिल्हा परिषदेच्या एका महिला अधिकारी आणि कर्मचाऱ्याला लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडलं. मागील पंधरा दिवसातील ही दुसरी मोठी कारवाई करण्यात आली आहे. वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर असं अटक कलेल्या आरोपींची नावं आहेत. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकच्या जिल्हा परिषद येथे कार्यरत असलेल्या जिल्हा परिषद,लघु पाटबंधारे विभागाच्या कार्यकारी अभियंता वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर,वरिष्ठ सहाय्यक,लेखा.वर्ग 3,पाटबंधारे विभाग,जिल्हा परिषद,नाशिक यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
16 लाखांचे बिल काढून देण्यासाठी 72 हजारांची लाच
एका कंत्राटदाराकडून पाटबंधाऱ्याच्या दुरुस्तीच्या कामाचे 16 लाखांचे बिल काढून देण्यासाठी 72 हजारांची लाच मागण्यात आली होती.त्यांनंतर तडजोड करून 50 हजार रुपये देण्याचे ठरले होते. जिल्हा परिषद,जुनी इमारत,नाशिक येथे 50 हजारांची लाच स्वीकारताना जिल्हा परिषदेच्या कार्यकारी अभियंता,पाटबंधारे विभाग,नाशिक वैशाली ठाकरे आणि अरुण धारणकर,वरिष्ठ सहाय्यक,लेखा.वर्ग 3,जिल्हा परिषद,नाशिक (जुनी इमारत) यांना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ अटक केली आहे.त्यांची अधिक चौकशी सुरू असून आणखी काही धागेदोरे या प्रकरणात समोर येतात का? याचाही तपास सध्या सुरू आहे.
नक्की वाचा >> Pune News : पुण्यात वाहन नोंदणीत घट, इलेक्ट्रिक वाहनांचीही घसरण, गुढी पाडव्याच्या दिवशी थक्क करणारा रिपोर्ट
पंधरा दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची दुसरी मोठी कारवाई
18 मार्च रोजी सायंकाळच्या सुमारास ही कारवाई करण्यात आली.गेल्या पंधरा दिवसांत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची ही दुसरी मोठी कारवाई आहे.या आधी GST विभागातील उच्च पदस्थ अधिकारी यांना 20 लाखांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने अटक केली होती. त्यामुळे कोणी सरकारी अधिकारी किंवा कर्मचारी हे सरकारी कामासाठी लाचेची मागणी करत असल्यास तातडीनं लाचलुचपत प्रतिबंधक विभागाशी संपर्क साधवा, असे आवाहन लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक भारत तांगडे यांच्याकडून करण्यात आले आहे.
नक्की वाचा >> CCTV Video : छत्रपती संभाजी नगरमध्ये नागरिकांची झोप उडाली, रात्रीच्या त्या व्हिडीओमुळे लोक भयभीत, काय घडलं?
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world