Navi Mumbai : नवी मुंबईत सिडकोच्या माजी अधिकाऱ्याविरोधात मोठी कारवाई, राहत्या घरी ACB चं पथक पोहोचलं अन्..

नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ACB) ने सिडकोचे माजी सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Navi Mumbai Crime News
मुंबई:

Navi Mumbai Crime News :  नवी मुंबई लाचलुचपत प्रतिबंध विभाग (ACB) ने सिडकोचे माजी सहाय्यक वसाहत अधिकाऱ्यावर मोठी कारवाई केली आहे. सागर मदनलालजी तापडिया (54) असं आरोपीचं नाव असून त्याच्याकडे तब्बल 1.94 कोटी रुपयांची अपसंपदा (बेहिशेबी मालमत्ता) असल्याचं उघडकीस आलं आहे. याप्रकरणी खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी सागर मदनलालजी तापडियाने सिडको नोडल कार्यालय पनवेल (सध्या सेवेतून बडतर्फ) असून त्याच्या विरोधात ही कारवाई करण्यात आली आहे. तसेच त्याच्या पत्नी मनीषा सागर तापडिया यांचाही या प्रकरणात समावेश आहे.लाचलुचपत प्रतिबंध विभागाचे पोलीस निरीक्षक किरणकुमार वाघ यांनी सरकारतर्फे फिर्याद दिली आहे. तपासा दरम्यान उघडकीस आलं आहे की, तपास कालावधीत आरोपी सागर तापडियाला एकूण 1.12 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले होते.मात्र,त्यांनी स्वतःच्या आणि पत्नीच्या नावावर एकूण 1.42 कोटी रुपयांची मालमत्ता संपादित केली. तसच 1.64 कोटी रुपयांचा खर्च केला.

Advertisement

नक्की वाचा >> KDMC News: नव्या चेहऱ्यांना संधी नाही, वादग्रस्त राहिलेल्या या नेत्याची स्थायी समिती सभापती पदावर पुन्हा वर्णी

आरोपीकडे तब्बल 1.94 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता

या सर्वांचा हिशोब करता आरोपीकडे तब्बल 1.94 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली.ही रक्कम त्यांच्या एकूण उत्पन्नाच्या सुमारे 173.36 टक्के आहे.तपासात असेही स्पष्ट झाले की, काही मालमत्ता पत्नी मनीषा तापडिया यांच्या नावावर ठेवण्यात आली असून त्यांनीही या गैरप्रकारात सहकार्य केल्याचा आरोप आहे.या प्रकरणी भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम 1988 (सुधारित 2018) अंतर्गत कलम 13(1)(ब), 13(2) आणि 12 अन्वये खारघर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक 147/2026 दाखल करण्यात आला आहे.

नक्की वाचा >> Pune News : पुण्यात 'या' भागातील पोलीस भरती दरम्यान भयंकर प्रकार, 9 उमेदवारांमुळे पोलिसांची झोपच उडाली

दरम्यान, तापडियाच्या राहत्या घराची झडती घेण्याची कारवाई सुरू असून पुढील तपास पोलीस उपअधीक्षक धर्मराज सोनके हे करत आहेत.लाचलुचपत प्रतिबंध विभागाच्या या कारवाईमुळे नवी मुंबईत खळबळ उडाली आहे. सरकारी अधिकाऱ्यांमधील भ्रष्टाचाराविरोधात कठोर भूमिका घेतली जात असल्याचे पुन्हा एकदा स्पष्ट झाले आहे.