जाहिरात

Badlapur Crime: पैशापुढे नात्यांचा विसर... मुलानेच बापाला निर्दयीपणे संपवलं; वार करुन घेतला जीव

बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.

Badlapur Crime: पैशापुढे नात्यांचा विसर... मुलानेच बापाला निर्दयीपणे संपवलं; वार करुन घेतला जीव

निनाद करमारकर, बदलापूर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात खून, मारामारी, अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे, त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होत आहे. अगदी क्षुल्लक कारणावरुन लोक एकमेकांचा जीव घेत असल्याची प्रकरणे उघडकीस आली आहेत. अशातच आता बदलापूरमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला असून मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

 बाप लेकाच्या नात्याला काळीमा फासणारी अन् हादरवुन टाकणारी घटना उघडकीस आली आहे.  बदलापूरमध्ये मुलानेच वडिलांची हत्या केल्याची घटना घडली आहे. अनंत कराळे असं हत्या झालेल्या वडिलांचं नाव असून गणेश कराळे असे निर्दयी मुलाचे नाव आहे. बेलवली परिसरात घडलेल्या या घटनेनंतर पोलिसांनी मुलगा गणेश कराळे याला ताब्यात घेतले आहे. पैसे आणि प्रॉपर्टीच्या वादातून हत्या करण्यात आल्याची शक्यता आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बदलापूरच्या बेलवली परिसरात अनंत कराळे यांचा गाळा असून तो खान कॅटरर्स यांना भाड्याने दिला आहे. या गाळ्यात मुलगा गणेश कराळे आणि त्याचे वडील अनंत कराळे हे बुधवारी सकाळी साडेसातच्या सुमारास आले होते. त्यानंतर भाडेकरूंना दुकानाच्या बाहेर काढून ते दुकानाच्या मागच्या बाजूला गप्पा मारण्यासाठी गेले.

(नक्की वाचा- Shivsena vs MNS : गंगाजल शुद्धच आहे पण काहींच्या विचारांचे काय? शिवसेनेचा राज ठाकरेंवर निशाणा)

याच वेळेस त्यांच्यात वाद झाले आणि मुलाने वडिलांच्या पोटात धारदार शस्त्राने वार केले. या हल्ल्यात अनंत कराळे यांचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच बदलापूर पश्चिम पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करून अनंत कराळे यांचा मृतदेह ग्रामीण रुग्णालयात शवविच्छेदनासाठी पाठवला. याप्रकरणी बदलापूर पश्चिम पोलीस अधिक तपास करत आहेत.

(नक्की वाचा-  Waqf Amendment Bill : वक्फ विधेयकाला मंजुरी मिळणार का? लोकसभेतील गणित कसं असेल?)