जाहिरात

आंदोलकांच्या सुटकेसाठी गेलेल्या वकिलांसोबत पोलिसांची अरेरावी? पोलीस ठाण्याबाहेर नेमकं काय घडलं?

तब्बल 28 आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आंदोलकांची सुटका करून घेण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेतला आहे.  

आंदोलकांच्या सुटकेसाठी गेलेल्या वकिलांसोबत पोलिसांची अरेरावी? पोलीस ठाण्याबाहेर नेमकं काय घडलं?
कल्याण:

बदलापुरातील (Badlapur Child Abuse) चिमुरड्यांवर झालेल्या अत्याचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी बदलापुरकरांनी रेल रोको करीत मोठं आंदोलन पुकारलं होतं. यावेळी तब्बल दहा तास रेल रोखण्यात आली होती. या घटनेचे पडसाद देशभरात उमटल्याचं पाहायला मिळालं. यावेळी तब्बल 300 जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून 22 जणांना आज कोर्टात हजर करण्यात आलं. या आंदोलकांची सुटका करून घेण्यासाठी वकिलांनी पुढाकार घेतला आहे.  

अटक आंदोलनकर्त्यांना मदत करण्यासाठी कल्याण आणि बदलापूर वकील संघटनेंनी पुढाकार घेतला आहे. आंदोलनकर्त्यांकडून कोणत्याही प्रकारची फी न घेता न्यायालयात बाजू मांडणार आहेत. वकिलांकडून मोफत आंदोलकांचा जामीन करून दिला जाणार आहे. 

या आंदोलनकर्त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. यांना जामीन मिळवून देण्यासाठी वकील कल्याण रेल्वे पोलीस ठाण्यात गेले असताना वादावादी झाल्याचं समोर आलं. कल्याण रेल्वे पोलीस आणि वकिलांमध्ये वाद झाला. जामीनासाठी आंदोलकांच्या सह्या घेण्यासाठी गेले असता रेल्वे पोलीस कर्मचाऱ्यांनी वकिलांशी अरेरावी केल्याचा आरोप करण्यात आला आहे. आंदोलकांची स्वाक्षरी घेण्यास पोलिसांकडून आडकाठी आणण्यात येत असल्याचा आरोप वकिलांकडून करण्यात आला. यावर वकिलांनी संताप व्यक्त केला. पोलिसांनी दिरंगाई केली नसती तर आंदोलन झालं नसतं. आंदोलकांमध्ये सरकारी कर्मचाऱ्यांचाही समावेश असल्याचं वकिलांनी सांगितलं. 

नक्की वाचा - 'बदलापुरातील आंदोलन राजकीयदृष्ट्या प्रेरित', मुख्यमंत्र्यांच्या वक्तव्याचा राज्यभरातून संताप

आरोपी अक्षय शिंदेंच वकीलपत्र कुणी घेऊ नये...
बदलापूर अत्याचार प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदे याला आज कल्याण कोर्टात हजर करण्यात आले. आरोपी अक्षय शिंदेचे वकीलपत्र कुणी ही घेऊ नये, असे आवाहन कल्याणच्या वकील संघटनेतर्फे करण्यात आले आहे.

Latest and Breaking News on NDTV


अशा आशयाचं फलक लावण्यात आलं आहे. 

बदलापूर प्रकरणी उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नेमणूक करण्यात आली, या नियुक्तीवर विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी आक्षेप घेतला आहे. ती शिक्षण संस्था एका पक्षाशी संबंधित आहे. आणि त्याच पक्षाच्या संबंधित वकिलाची विशेष वकील म्हणून नेमणूक करण्यात आली आहे. उद्या हे प्रकरण दाबले गेले तर त्याला जबाबदार कोण? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. 

Listen to the latest songs, only on JioSaavn.com