संशयाचे भूत डोक्यात, कोयत्याने वार करुन तरुणाला संपवलं; बारामती हादरली

बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins

देवा राखुंडे, बारामती: कोयत्याने वार करुन 23 वर्षीय तरुणाचा निर्घृण खून केल्याची भयंकर घटना बारामतीमध्ये घडली आहे. सहा महिन्यातील तिसरी खूनाची घटना समोर आल्याने बारामती शहर हादरुन केले आहे. या हत्येप्रकरणी बारामती शहर पोलीस ठाण्यात तिघांविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. 

याबाबत सविस्तर माहिती अशी की, बारामतीतील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर रात्री अकरा वाजण्याच्या सुमारास 23 वर्षीय युवकाचा कोयत्याने निघृण वार करत खून करण्यात आला आहे. या प्रकरणाने बारामती हादरली आहे.गेल्या सहा महिन्यातील हा तिसरा खुनाचा प्रकार आहे.

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

रात्री साडेदहा च्या सुमारास प्रगतीनगर परिसरातील क्रिएटिव्ह अकॅडमी ते तुळजाराम चतुरचंद कॉलेज रस्त्यावर अनिकेत सदाशिव गजाकस या युवकावर कोयत्याने वार करण्यात आले. यामध्ये गंभीर जखमी झाल्याने अनिकेत गजाकस याचा मृत्यू झाला. 

धक्कादायक बाब म्हणजे अनिकेत हा मुलीशी बोलत असल्याच्या कारणावरून हा खून झाल्याचा संशय आहे. याप्रकरणी अभिषेक सदाशिव गजाकस यांच्या फिर्यादीवरुन बारामती शहर पोलिसांनी तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. पुढील तपास सहाय्यक निरीक्षक गजानन ठेके करत आहेत.

Advertisement

( नक्की वाचा : 'भारत जोडो' अभियानात शहरी नक्षलवाद्यांचा शिरकाव, RR पाटलांचा संदर्भ देत CM फडणवीसांचा खुलासा )

दरम्यान, आष्टी शहरातही तीन दिवसांपूर्वी अशीच एक भयंकर हत्येची घटना समोर आली होती. क्षुल्लक कारणावरुन भाडेकरु रशीद शेख याचा घरमालकानेच खून केला होता. याबाबत आता धक्कादायक माहिती समोर आली आहे. खोलीचे भाडे न देता सोडून जात असल्याने आरोपी खुशालने त्याच्याकडे याबाबत विचारणा केली.

यावेळी  मृतक रशीदने खुशालच्या कुटुंबियांना  अश्लील शिवीगाळ केली. याचाच राग मनात ठेवून आरोपी खुशालने रॉडने मारहाण तसेच धारदार शस्त्राने गळा चिरून खून केल्याचे निष्पन्न झाले  आहे.आरोपीला अटक करून पुढील कारवाई आष्टी पोलीस करीत आहेत. 

Advertisement