आकाश सावंत, बीड: खून, मारामारी, गुंडगिरीच्या घटनांनी बीड जिल्हा गेल्या अनेक महिन्यांपासून चर्चेत आहे. पोलिसांच्या कडक कारवाईनंतरही बीडमधील गुंडगिरी काही थांबत नसल्याचे दिसत आहे. दोन दिवसांपूर्वीच क्षुल्लक कारणावरुन महिलेसह तिच्या कुटुंबियांना मारहाण झाल्याची घटना समोर आली होती. अशातच आता अनुसूचित जातीतील महिलेच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार माजलगावमध्ये घडला आहे.
Jalgaon News: वडिलांकडून हत्या , काका आणि भावाने केली मदत; पोलिसांनी बनाव पाडला उघड
समोर आलेल्या माहितीनुसार, माजलगावच्या गोविंदपूर गावात जुना राजकीय वादातून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. गावातील राम केरबा गवते या वकिलासह अन्य काही जणांनी अनुसूचित जातीतील महिलेच्या घरात घुसून त्यांना बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे परिसरात भीतीचं आणि तणावाचं वातावरण पसरलं आहे.
पीडित महिला आर्शिता दगडू आवळे या घरात असताना गावातील एका वकिलासह पाच जणांनी घरात शिरून जातीवाचक अपशब्द वापरत बेदम मारहाण केली. तसेच जीवे मारण्याच्या धमक्याही दिल्या. पीडित महिलेने या प्रकारानंतर लागलीच पोलीस ठाण्यात धाव घेतली. तर या प्रकरणी माजलगाव ग्रामीण पोलिस ठाण्यात वकिलासह सहा जणांविरोधात अनुसूचित जाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यासह इतर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत. पीडित महिलेवर व तिच्या कुटुंबीयांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. मात्र आरोपी अद्याप फरार आहे.
(नक्की वाचा- Miraj News: 3 दिवस, 3 रंग, 3 गाठोडी! वाढदिवसाच्या बॅनर खाली जादूटोणा)