
मंगेश जोशी, जळगाव
Jalgaon News : मुलाच्या सततच्या दारूच्या त्रासाला कंटाळून पित्यानेच डोक्यात दगड घालून मुलाची हत्या केली. जामनेर तालुक्यातील कसबा पिंपरी येथे ही धक्कादायक घडना घडली आहे. शुभम सुरडकर असे हत्या करण्यात आलेल्या मुलाचे नाव आहे. तर धनराज सुरडकर असं आरोपी पित्याचं नाव आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मिळालेल्या माहितीनुसार, शुभम सुरडकर याला दारूचे प्रचंड व्यसन लागले होते. काही दिवसांपूर्वी त्याची पत्नी माहेरी निघून गेली होती. त्यानंतर शुभम दारू पिऊन घरातील प्रत्येकाशी वाद घालत होता. दरम्यान शुभमच्या त्रासाला घरातील सर्वच कंटाळले होते. रोजच्या वादामुळे घरातील सर्वच मानसिक तणावात होते.
(नक्की वाचा - Iran Attacks Israel : इराणचा इस्त्रायलवर जोरदार प्रहार, 10 ठिकाणांवर हल्ला)
अखेर रोजच्या वादाला कंटाळून शुभमचे वडील धनराज सुरडकर यांनी शुभमच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या केली. त्यानंतर भाऊ व लहान मुलाच्या मदतीने धनराज सुरडकर यांनी शुभमच्या मृतदेहाची विल्हेवाट लावून कुणीतरी अज्ञात आणि शुभमची हत्या केल्याचा बनाव रचण्याचा प्रयत्न केला.
(नक्की वाचा- Miraj News: 3 दिवस, 3 रंग, 3 गाठोडी! वाढदिवसाच्या बॅनर खाली जादूटोणा)
मात्र पोलिसांनी अवघ्या 8 तासात या गुन्ह्याचा छडा लावत शुभमचे वडील धनराज सुरडकर यांनीच आपल्या मुलाची हत्या केल्याचे उघड केले. याप्रकरणी धनराज सुरडकर यांच्यासह हिरालाल सुरडकर व शुभमचा लहान भाऊ गौरव सुरडकर या तीन जणांना अटक करून त्यांच्या विरोधात फत्तेपूर पोलीस स्टेशनमध्ये खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world