जाहिरात

Walmik Karad : 2 पोलीस बॉडीगार्ड, 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे तरीही शस्त्र परवाना कसा? बीड स्थानिक प्रशासनावर अनेक सवाल 

कराडवर एक-दोन नव्हे तर तब्बल 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला.

Walmik Karad : 2 पोलीस बॉडीगार्ड, 15 गंभीर स्वरुपाचे गुन्हे तरीही शस्त्र परवाना कसा? बीड स्थानिक प्रशासनावर अनेक सवाल 
बीड:

बीडमधील मस्साजोग गावाचे सरपंच संतोष देशमुख प्रकरणाचे मुख्य सूत्रधार असा आरोप असलेला वाल्मिक कराड याला अद्याप पोलिसांनी अटक केलेली नाही. तो अद्यापही फरार असल्याची माहिती आहे. या प्रकरणात भाजप आमदार सुरेश धस यांच्यासह शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड आणि अनेक आमदारांनी हा मुद्दा विधिमंडळात मांडला. यावेळी पहिल्यांदा वाल्मिक कराडचं नाव घेऊन त्याच्यावर अनेक आरोप करण्यात आले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

यानिमित्ताने बीडमध्ये सुरू असलेला खंडणीच्या प्रकाराबद्दलही मोठी चर्चा सुरू झाली आहे. विधिमंडळात संतोष देशमुख हत्या प्रकरणावर बोलताना जितेंद्र आव्हाडांनी बीडचा बिहार होत चालला असल्याची भीतीही व्यक्त केली होती. दरम्यान वाल्मिक कराड बाबत आता नवनव्या गोष्टी समोर येत आहेत. दोन कोटी रुपयांची खंडणी मागितल्याच्या गुन्ह्यातील आरोपी वाल्मिक कराडवर बीडचे स्थानिक प्रशासन किती मेहरबान होते याबाबत आता खुलासे होऊ लागले आहेत.

Santosh Deshmukh case : राष्ट्रवादीच्या संध्या सोनावणेंची 7 तास कसून चौकशी, CID ने काय विचारलं?

नक्की वाचा - Santosh Deshmukh case : राष्ट्रवादीच्या संध्या सोनावणेंची 7 तास कसून चौकशी, CID ने काय विचारलं?

कराडवर एक-दोन नव्हे तर तब्बल 15 गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. असे असतानाही त्याला शस्त्र परवाना देण्यात आला. विशेष म्हणजे त्याच्यावर गुन्हा दाखल होईपर्यंत दोन पोलीस बॉडीगार्डही होते. त्यामुळे या सर्व प्रकरणात पोलिसांची भूमिका संशयास्पद आहे. धक्कादायक म्हणजे ऑक्टोबर 2024 मध्ये तत्कालीन पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांनी गुन्हे दाखल असलेल्या 245 जणांची यादी जिल्हाधिकाऱ्यांना दिली होती. यात कराडचेही नावे होते. परंतु, जिल्हाधिकाऱ्यांनी यावर काहीच कारवाई केली नाही. आता कराडचे कारनामे समोर येताच नोटीस देण्यात आली आहे.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com