जाहिरात

Beed News: बीडमध्ये आणखी एक निर्घूण हत्या! खूनात खासदार पुत्राचे कनेक्शन काय? प्रकरण चिघळणार

दरम्यान खासदार बजरंग सोनावणे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत.

Beed News: बीडमध्ये आणखी एक निर्घूण हत्या! खूनात खासदार पुत्राचे कनेक्शन काय? प्रकरण चिघळणार
  • बीड जिल्ह्यातील केज टाकळी येथे विलास घुले यांची हत्या करण्यात आली आहे
  • हत्या प्रकरणात खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलावर आरोप आहे.
  • आमदार धनंजय मुंडे, मंत्री पंकजा मुंडे यांनी तातडीने कारवाई करण्याची मागणी केली आहे
बीड:

आकाश सावंत 

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येच्या आठवणी ताज्या असतानाच आणखी एक हत्येनं बीड जिल्हा हादरून गेला आहे. विलास घुले या तरुणाचे बीड जिल्ह्याती केज टाकळी इथं हत्या करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या हत्या प्रकरणात बीडचे खासदार बजरंग सोनावणे यांच्या मुलाचे नाव घेतले जात आहे. त्याला अटक करावा अशी मागणी मृत घुले याच्या कुटुंबीयांकडून केली जात आहे. यावरून आता राजकारणी ही तापले आहे. याप्रकरणी आमदार धनंजय मुंडे आणि मंत्री पंकजा मुंडे यांनी ही विधीमंडळात आवाज उठवला आहे. तर ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही कारवाईची मागणी केली आहे. मुलावर आरोप होत असताना त्याच वेळी खासदार बजरंग सोनावणे यांनी ही चौकशी करा असं सांगितलं आहे. 

अनैतिक संबंधातून सुरू असलेले भांडणे सोडवण्यासाठी विलास घुले गेले होते. त्याचं बीडच्या केज तालुक्यातील टाकळी येथे हॉटेल आहे. भांडण झाली असता विलास यांनी मध्यस्थी केली. मात्र भांडण राहीलं बाजूला आणि विलास यांच्यावर हल्ला करण्यात आला. या हल्लात विलास यांचा जीव गेला. त्यानंतर आरोपी हे तिथून पळून गेले. या प्रकरणी 9 जणांवर केज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यातील तीन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. इतर आरोपींना पकडण्यासाठी पोलिसांचे एक पथक रवाना झाले आहे. सर्वच आरोपींना अटक करण्यात यावे या मागणीसाठी मृत तरुणाचे नातेवाईक आक्रमक झाले होते. त्यांनी  पोलिस ठाण्यात गर्दी केली होती. जोपर्यंत आरोपींना अटक होणार नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही असा पवित्रा त्यांनी घेतला होता. 

नक्की वाचा - Pune Lohagad Case: केतनच्या हत्ये आधी सिया सोबतचा 'तो' Video आला समोर, पाहून मनाला लागेल चटका

तरुणाचा मृतदेह अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातच ठेवण्यात आला होता. मृतदेह रूग्णालयात गेल्या दोन दिवसापासून आहे. त्यामुळे केजमध्ये सध्या तणावाची परिस्थिती आहे. विलास घुले या तरुणाची चाकूने भोसकावून हत्या करण्यात आली होती. त्यानंतर आरोपी तिथून पळून गेले. त्यांना पळून जाण्यासाठी खासदार बजरंग सोनावणे यांचा मुलगा सौरभ सोनावणे यांने मदत केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सौरभ सोनवणेंवर गुन्हा दाखल करा. त्यांना अटक करा अशी मागणी करण्यात आली होती. ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी ही या वादात उडी घेतली होती. त्यांनी पोलीसांनी तातडीने कारवाई करावी अशी मागणी केली. 

नक्की वाचा - Pune News: केतन अग्रवालच्या हत्येची Inside Story! खून पचला होता पण एका लिडनं संपूर्ण केस फिरली

दरम्यान खासदार बजरंग सोनावणे यांनी हे सर्व आरोप फेटाळून लावले आहेत. ते म्हणाले घडलेली घटना अत्यंत दुर्दैवी आहे. यात जे कोणी दोषी असतील त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी. एवढेच नव्हे तर या घटनेशी आपला काही संबंध नाही. काही कराण नसताना माझ्या मुलाचं नाव या घटनेत जोडले जाते. माझी पोलीस प्रशासनाला विनंती आहे. जे काय आमचे सीडीआर असतील, लोकेशन असतील हे चेक करा. यात आम्ही जर दोषी असू तर आमच्यावर कारवाई करा. असं ही सोनवणे यांनी सांगितलं. लोकांना कोण चेतावणी देत आहेत ते ही पोलीसांनी पाहावे असं ही ते यावेळी म्हणाले. मात्र या घटनेनंतर बीडचे राजकीय वातावरण ही तापले आहे. 
 

संपूर्ण बातमी वाचा

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com