जाहिरात

Beed News : होळीचा आनंद क्षणात विरला; कृष्णाचा भयंकर शेवट, मित्रांना जबर धक्का!

धुलिवंदन साजरा करण्यासाठी निघालेल्या बीडमधील तरुणांसोबत धक्कादायक प्रकार घडला.

Beed News : होळीचा आनंद क्षणात विरला; कृष्णाचा भयंकर शेवट, मित्रांना जबर धक्का!

आकाश सावंत, प्रतिनिधी

Beed News : धुलिवंदन साजरा करण्यासाठी निघालेल्या बीडमधील तरुणांच्या कारला भीषण अपघात झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. धक्कादायक बाब म्हणजे या अपघातात एक जण जागीच ठार तर तिघे जखमी झाल्याची घटना बीड ते शिरूर रोडवर रायमोह जवळ घडली आहे. कृष्णा मुळे असे अपघातात ठार झालेल्या तरुणाचे नाव आहे.

कृष्णा हा आपल्या मित्रांसोबत धुलिवंदनाचा सण साजरा करण्यासाठी वॉटर पार्कला जात होता. मध्यरात्री त्यांची गाडी बीड ते शिरूर रोडवरून जात असताना चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटल्याने ही गाडी रस्त्याच्या बाजूला पलट्या खात थेट एका विहिरीच्या कठड्याला जाऊन धडकली. सुदैवाने ही गाडी विहिरीत पडली नाही.

नक्की वाचा - Mumbai Video : मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ; प्रसिद्ध दालखिचडीमध्ये भयंकर जीव; ग्राहकाने आवाज चढवताच मॅनेजरने..

परंतु या भीषण अपघातात कृष्णा मुळे हा जागीच ठार झाला तर प्रसाद खोले, यश पेंढारे आणि अन्य एक जण यामध्ये जखमी झाले आहेत. या कारच्या पाठीमागे त्यांच्याच मित्रांची आणखी एक गाडी होती. त्या गाडीतील मित्रांनी जखमींना तातडीने बीड येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. कृष्णा मुळे यालाही तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र त्याचा मृत्यू झाला. कृष्णा मुळे याच्या इतर मित्रांवर सध्या उपचार सुरू आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com