
संजय तिवारी, प्रतिनिधी
आयकर विभागाकडून मोठी कारवाई करण्यात आली असून विदर्भ आणि मराठवाडा या भागात आयकर विभागाचं धाडसत्र सुरू आहे. यामध्ये बेनामी मालमत्ता आणि काही सोन्या चांदीच्या दुकानांवरही कारवाई करण्यात आली आहे. विदर्भ-मराठवाड्यातील सुमारे 452 कोटींच्या बेनामी मालमत्ता जप्त करण्यात आल्या असून 14 मे रोजी अमरावती जिल्ह्यात सोन्या चांदीच्या दुकानावरही आयकर विभागाकडून धाडसत्र राबवण्यात आलं होतं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
बेनामी संपत्तीवरील कारवाईत जप्ती ही पहिली पायरी असते. बेनामी संपत्ती म्हणजे गैर प्रकाराने गोळा केलेल्या रकमेच्या किंवा स्थावर संपत्तीच्या माध्यमातून आपल्यावर शंका येऊ नये यासाठी ती इतर कुणाच्या नावावर करणे होय. विविध मल्टिस्टेट को ऑपरेटिव्ह सोसायट्यांमध्ये विविध खात्यांमध्ये ठेवण्यात आलेल्या या रकमा असून यात काही सोने आणि एका कारचा देखील समावेश आहे. सामान्यपणे जगणाऱ्या नागरिकांच्या नावावर सहकारी सोसायटीच्या खात्यात मोठी रक्कम ठेवल्याची ही प्रकरणे असून सर्व 30 प्रकरणांचा तपास तीव्र गतीने सुरू आहे.
नक्की वाचा - Jalgaon News : 400-425 किमी लांबून जळगावात आला, प्रेयसीला व्हिडीओ कॉल केला अन् केली आत्महत्या
मार्च 2025 पर्यंतची ही कारवाई 2016 च्या बेनामी व्यवहार प्रतिबंध सुधारित कायद्याखाली करण्यात आली आहे. आयकर विभागातर्फे या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी वेगळे डेस्क तयार करण्यात आले आहे. नुकतेच मध्य प्रदेशातील एका अती सामान्य जीवन जगणाऱ्या रोजंदारीवर काम करणाऱ्या मजूर व्यक्तीला 314 कोटींची नोटीस बजावण्यात आली होती. त्याच्या खात्यात शेकडो कोटी रुपये आढळून आले होते आणि याची त्या व्यक्तीला काहीच कल्पना नव्हती. हे खाते ज्या सहकारी सोसायटीत होते ती अत्यंत छोट्या जागेत असलेली कोऑपरेटीव्ह सोसायटीच आता बंद करण्यात आली आहे, असे आयकर विभागातील सूत्रांनी सांगितले आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world