जाहिरात

Buldhana News : 1000 हून अधिक पोलीस अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर, सीएच्या मदतीने 4 वर्षात केला मोठा फ्रॉड 

बुलढाणा जिल्हा पोलीस दलात आयकर विभागाकडून आलेल्या नोटीसीमुळे खळबळ उडाली आहे.

Buldhana News : 1000 हून अधिक पोलीस अधिकारी आयकर विभागाच्या रडारवर, सीएच्या मदतीने 4 वर्षात केला मोठा फ्रॉड 

अमोल सराफ, प्रतिनिधी

Buldhana News : बुलढाणा जिल्हा पोलीस दलात आयकर विभागाकडून आलेल्या नोटीसीमुळे खळबळ उडाली आहे. तब्बल 1050 पोलीस अंमलदारांना गेल्या तीन ते चार वर्षात आयकर रिटर्न्समध्ये बोगस कपाती दाखवून कर चोरी करण्याच्या संशयावरून नोटीस बजावण्यात आली आहे. याबाबत आयकर विभागाने पोलीस अधीक्षक कार्यालयालाच नोटीस बजावली आहे. त्यामुळे बुलढाणा पोलीस दलात खळबळ उडाली आहे. हा प्रकार सीएच्या संगनमताने गेल्या तीन ते चार वर्षात पोलीस कर्मचाऱ्यांनी वैयक्तिक स्तरावर केल्याचे समोर आले आहे. आयकर विभागाच्या पडताळणीत ही बाब समोर आली आहे. 

सीएच्या मदतीने फसवणूक

अनेक पोलीस कर्मचाऱ्यांनी कलम 80c आणि गृह कर्जावरील व्याज सवलतीच्या अंतर्गत बनावट गुंतवणूक  दाखवत कर कपात मिळवली. प्रत्यक्षात विमा, पीपीएफ, म्युच्युअल फंड किंवा गृह कर्ज नसतानाही मोठ्या रकमेच्या कपाती दाखवल्या गेल्या आहेत आणि हे सर्व रिटर्न एकाच चार्टर्ड अकाउंटंटच्या माध्यमातून दाखल करण्यात आल्याचं समोर आलं आहे. 

MHADA Houses : म्हाडाच्या घराच्या स्वप्नांचा चक्काचूर; कुटुंबाचे 37 लाख बुडाले, तुम्ही ही चूक करू नका!

नक्की वाचा - MHADA Houses : म्हाडाच्या घराच्या स्वप्नांचा चक्काचूर; कुटुंबाचे 37 लाख बुडाले, तुम्ही ही चूक करू नका!

पोलीस दलात खळबळ ..

याप्रकरणी जिल्हा पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांनी कठोर भूमिका घेत ६ नोव्हेंबर रोजी सर्व पोलीस अंमलदारांना आपले इन्कम टॅक्स रिटर्न्स तपासून जर चूक आढळल्यास तत्काळ सुधारित विवरणपत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहे. आयकर चोरीच्या संशयावरून इतक्या मोठ्या प्रमाणात पोलीस कर्मचाऱ्यांना नोटीस आल्याने जिल्हा पोलीस दलात खळबळ उडाली आहे.  याबाबत पोलीस अधीक्षक निलेश तांबे यांना विचारणा केली असता अभ्यास करून मी प्रतिक्रिया देईल असं त्यांनी सांगितलं.

Listen to the latest songs, only on JioSaavn.com