जाहिरात

Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरात 200 ठिकाणांवर छापा; छ. संभाजीनगरच्या फर्मची 16 तास चौकशी

Income Tax Department raids : आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक आयटीआरमध्ये चुकीची माहिती देऊन कर सवलत घेत आहेत. हे लोक बनावटी कागदपत्रे दाखवतात आणि खोटे दावे करतात.

Income Tax : आयकर विभागाची मोठी कारवाई, देशभरात 200 ठिकाणांवर छापा; छ. संभाजीनगरच्या फर्मची 16 तास चौकशी

आयकर विभागाकडून देशभरातील सहा राज्यातील  सुमारे 200 ठिकाणांवर एकाच वेळी छापेमारी करण्यात आली आहे. टॅक्स रिटर्नमध्ये चुकीची कपात आणि सूट दाखवून करचोरी सुरू होती. आयकर विभागानुसार म्हणण्यानुसार, तपासात असंही आढळून आले की, काही आयटीआर तयार करणारे, टॅक्स सल्लागार, अनेक मध्यस्थ बनावट कपात आणि कर सवलतीच्या नावाखाली नियोजनबद्ध पद्धतीने रिटर्न भरत होते. काही प्रकरणांमध्ये, बनावट टीडीएस रिटर्न भरून अधिक परतावा मिळविण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्र, तामिळनाडू, दिल्ली, गुजरात, पंजाब आणि मध्य प्रदेशातील केलेल्या छापेमारीत महत्त्वाचे डिजिटल आणि कागदोपत्री पुरावे समोर आले आहेत. चार्टर्ड अकाउंट आणि टॅक्स प्रॅक्टिसनर्स यांच्याविरोधात ही  कारवाई करण्यात आली आहे. राजकीय पक्षांच्या नावाने देणग्या स्वीकारून करचोरीच्या संशयावरून ही छापेमारी करण्यात आली होती. 

40,000 रुपये घराच्या EMI मध्ये भरावे की 40,000 ची गुंतवणूक करून भाड्याने राहावे; पैसे वाचविण्याची जबदरस्त पद्धत...

नक्की वाचा - 40,000 रुपये घराच्या EMI मध्ये भरावे की 40,000 ची गुंतवणूक करून भाड्याने राहावे; पैसे वाचविण्याची जबदरस्त पद्धत...

आयकर विभागाला मिळालेल्या माहितीनुसार, काही लोक आयटीआरमध्ये चुकीची माहिती देऊन कर सवलत घेत आहेत. हे लोक बनावटी कागदपत्रे दाखवतात आणि खोटे दावे करतात. यामुळे सरकारला टॅक्समध्ये नुकसान सहन करावे लागते. आयकर विभागाने हे प्रकरण गांभीर्याने घेत देशभरात तपास सुरू केला. त्यांनी अनेक शहरं, कार्यालयं आणि घरांमध्ये छापे मारले. यादरम्यान महत्त्वाची कागदपत्रं आणि पुरावे मिळाले आहेत. 

महाराष्ट्रात छत्रपती संभाजीनगरमध्ये छापा...
आयकर विभागाकडून केलेल्या कारवाईत छत्रपती संभाजीनगर येथील सीए फर्मचा समावेश आहे. संभाजीनगरच्या फर्मची 16 तास चौकशी करण्यात आली. देणग्यांसाठी कराची सवलत असलेल्या कलम 80जी अन्वये 300 कोटींचा कर चुकवल्याचा संशय आहे. 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com