Kalyan News: कल्याण हादरलं! भोंदूबाबाने अल्पवयीन मुलीवर केला लैंगिक अत्याचार, भयानक कारण आलं समोर

कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 78 वर्षीय भोंदू बाबा शाहिद शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
Kalyan Minor Girl Physical Assault

Kalyan Minor Girl Physical Assault News : कल्याण येथे भोंदूगिरीच्या नावाखाली अल्पवयीन मुलीसोबत अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.याप्रकरणी खडकपाडा पोलिसांनी 78 वर्षीय भोंदू बाबा शाहिद शेख याला अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.मिळालेल्या माहितीनुसार, खडकपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत राहणारी एक महिला वर्षभरापासून कल्याण पश्चिम भागात वास्तव्यास आहे.यापूर्वी ती आपल्या कुटुंबासोबत उल्हासनगर येथे राहत होती. तिची सासू आणि पतीचे निधन झाले होते. त्यानंतर ओळखीतील एका व्यक्तीने त्यांच्या घरात बाधा असल्याचे सांगितले. बाधा दूर करून घरात शांती नांदावी यासाठी पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला. आरोपी भोंदूबाबावर बीएनएस 64, (2i) 64( 2m ) 65 (1), पोस्को एक्ट 4, 8, 12 आणि जादूटोणा अॅक्ट  3( 1), 3 (2) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलिसांनी एका तासात शाहिद शेखला अटक केली

या पूजेच्या नावाखाली शाहिद शेखने 2 मे रोजी महिलेच्या 15 वर्षीय मुलीला समोर बसवून पूजा केली.त्यानंतर 6 मे रोजी तो पुन्हा घरी आला. त्यावेळी मुलीची आई घरात नसताना पूजेच्या बहाण्याने आरोपीने अल्पवयीन मुलीसोबत गैरप्रकार केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने हा प्रकार आईला सांगितल्यानंतर महिलेने खडकपाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

Advertisement

नक्की वाचा >> Pune News : पुणे-सोलापूर महामार्गावरून प्रवास करताय? 'या' कारमुळे सर्वच प्रवाशांच्या जीवाला धोका, थरारक Video

त्यानंतर पोलिसांनी एका तासात शाहिद शेखला अटक केली.दरम्यान,खडकपाडा  पोलिसांनी आरोपीला अटक करून  कल्याण न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 13 मेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे.भोंदूगिरीच्या नावाखाली आरोपीने आणखी किती महिला किंवा मुलींना फसवले आहे,याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे,अशी माहिती कल्याणचे एसीपी अशोक होनमाने यांनी दिली आहे. 

नक्की वाचा >>Pune News: म्यानमारमधून सुटका होताच मायदेशी परतले..नवी मुंबईत आरोपींनी केलं सर्वात मोठं कांड, पुणे पोलीस अन्..