जाहिरात

Ulhasnagar News: उल्हासनगर हादरलं! शिवनेरी नगरात रक्तरंजित घटना, संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट

उल्हासनगर शहरात भयंकर गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तरुणाची भरदिवसा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.

Ulhasnagar News: उल्हासनगर हादरलं! शिवनेरी नगरात रक्तरंजित घटना, संपूर्ण परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचं सावट
Ulhasnagar Murder News Today
मुंबई:

Ulhasnagar Crime News :  उल्हासनगर शहरात भयंकर गुन्हेगारीनं पुन्हा एकदा डोकं वर काढलं असून नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण पसरलं आहे. तरुणाची भरदिवसा दगडाने ठेचून निर्घृण हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे.या घटनेमुळं प्रचंड खळबळ उडाली आहे. उल्हासनगर कॅम्प 1 मधील शिवनेरी नगर परिसरात आज सोमवारी सायंकाळी 5 वाजताच्या सुमारास या तरुणाची हत्या करण्यात आली. प्रवीण अशोक वर्मा (27)असं हत्या झालेल्या तरुणाचं नाव आहे. अज्ञात व्यक्तीने प्रविणच्या डोक्यात मोठा दगड टाकून त्याला संपवलं, अशी प्राथमिक माहिती आहे.

घटनेची माहिती मिळताच उल्हासनगर पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. परिमंडळ चारचे पोलीस उपायुक्त सचिन गोरे तसेच सहाय्यक पोलीस आयुक्त अमोल कोळी यांनीही तापासाची सूत्रे हाती घेतली आहेत. पोलिसांकडून पंचनामा व इतर कायदेशीर प्रक्रिया सुरू करण्यात आली असून आरोपींचा शोध घेण्यासाठी विशेष पथके नियुक्त करण्यात आली आहेत.

नक्की वाचा >> Dombivali News: व्याजी पैसे देऊन महिलांकडे शरीरसुखाची मागणी, एका महिलेवर वारंवार अत्याचार, कोर्टाने दिला दणका

तरुणाच्या हत्येमागचं नेमकं कारण काय?

दरम्यान,या हत्येमागील नेमके कारण अद्याप अस्पष्ट असून जुना वाद,वैयक्तिक वैमनस्य किंवा इतर कोणता सराईत गुन्हेगार आहे का,याचा तपास पोलिसांकडून सर्व बाजूंनी सुरु आहे.या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून पुढील तपास उल्हासनगर पोलिसांकडून सुरू आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com