जाहिरात

Ajit Pawar Death : अजित पवारांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज देण्यास केंद्रीय नागरी सुरक्षा विभागाचा नकार

राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेकांना शंका उपस्थित केल्या जात आहेत.

Ajit Pawar Death : अजित पवारांचे मुंबई विमानतळावरील CCTV फुटेज देण्यास केंद्रीय नागरी सुरक्षा विभागाचा नकार

देवा राखुंडे, प्रतिनिधी

Ajit Pawar Plane Crash : राज्याचे दिवंगत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमान अपघाताबाबत अनेकांना शंका उपस्थित केल्या जात आहेत. रोहित पवारांनी पत्रकार परिषद घेत अनेक सवाल उपस्थित केले. अशातच माहिती अधिकार कार्यकर्ते नितीन यादव यांनी केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाकडे 28 जानेवारी 2026 रोजीचे मुंबई विमानतळावरील पहाटे सहा ते सकाळी नऊ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज देण्यात यावे अशी मागणी 10 फेब्रुवारी रोजी माहिती अधिकारात केली होती. मात्र हे सीसीटीव्ही फुटेज देण्यास केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने नकार दिला आहे.

नितीन यादव यांच असं म्हणणं आहे की, अनेक वेळा या संदर्भात मी पाठपुरावा केल्यानंतर केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाने मी मागवलेली माहिती नाकारली आहे. यामुळे अजितदादांचा खरोखरच घात झाला का ? हा मोठा प्रश्न यामुळे पडतो आहे.

नक्की वाचा - Rohit Pawar: अजित पवारांच्या विमानाचा अपघात कसा झाला? रोहित पवारांच्या आरोपाला सरकारचं उत्तर, तपासला नवी दिशा

पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेजची मागणी...

केंद्रीय नागरी सुरक्षा वाहतूक विभागाच्या निर्णयाविरोधात नितीन यादव यांनी अपिल केलं असून यात सर्वोच्च न्यायालय तसेच केंद्रीय माहिती आयुक्त यांचे जजमेंट देऊन पुन्हा फुटेजची मागणी केली आहे. तसेच मुंबई पोलीस आयुक्त यांना देखील माहिती अधिकाराद्वारे मुंबई येथील देवगिरी या शासकीय निवासस्थानपासून ते मंत्रालयपर्यंतचे मुंबई वाहतुक पोलीस विभागाकडे असणारे दिनांक २८ जानेवारी २०२६ रोजचे पहाटे ६ ते सकाळी ९ दरम्यानचे सीसीटीव्ही फुटेज मागविले आहे.

उपमुख्यमंत्री अजित पवार हे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून संविधानिक पदावर काम करणारे लोकप्रतिनिधी तसेच शासकीय जनसेवक म्हणून कार्यरत असल्याने केंद्रीय विमान वाहतुक विभागाने जे मुंबई विमानतळावरील सीसीटीव्ही फुटेज नाकारले आहे ते धक्कादायक असून त्यांनी तत्काळ अजित पवार यांचे त्या दिवसाचे सीसीटीव्ही  फुटेज उपलब्ध करावे अशी नितीन यादव यांची मागणी आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com