![Crime News: दारुसाठी, हप्त्यासाठी जिवावर उठले! 5 घटनांनी खळबळ; 'त्या' शहराची भयंकर क्राईम डायरी! Crime News: दारुसाठी, हप्त्यासाठी जिवावर उठले! 5 घटनांनी खळबळ; 'त्या' शहराची भयंकर क्राईम डायरी!](https://c.ndtvimg.com/2025-02/8ghp23gg_crime-_625x300_09_February_25.jpg?im=FeatureCrop,algorithm=dnn,width=773,height=435)
मोसीन शेख, छत्रपती संभाजीनगर: गेल्या काही दिवसांपासून राज्यात सुरु असलेल्या हत्या, अत्याचाराच्या घटनांनी खळबळ उडाली आहे. अशातच छत्रपती संभाजीनगरमध्ये क्षुल्लक कारणावरुन जीवघेणा हल्ल्याच्या पाच घटना समोर आल्या आहेत. या हल्ल्याच्या घटनांनी शहरात भितीचे वातावरण पसरले असून अशा गुन्हेगारीला आळा घालण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
हप्ता दे म्हणत, थेट डोक्यात घातला.....
बोरवेलचा व्यवसाय करायचा असेल तर प्रति महिना दहा हजार रुपये हप्ता दे, असे म्हणत एकाच्या डोक्यात लोखंडी पाईप मारल्याची घटना तिसगाव परिसरात घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सागर मोरे (पूर्ण माहित नाही) अशी आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी साहेबलाल बाबू पठाण रा. गारखेडा रोशन मशीदजवळ यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 1 फेब्रुवारी सायंकाळी चार वाजेच्या सुमारास सागर मोरे याने तुला येथे बोरवेलचा व्यवसाय करायचा असेल तर प्रति महिना दहा हजार रुपये हप्ता द्यावा लागेल, असे सांगितले. पैसे देण्यास नकार दिल्याने शिवीगाळ करत आरोपीने फिर्यादींच्या डोक्यात लोखंडी पाईपने मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
दारु पाज म्हणत मारहाण...
घरी पायी जात असलेल्या एकाला अडवून दारू पाज म्हणत बदडल्याची घटना फुलेनगर हर्सूल परिसरात घडली. या प्रकरणी हर्सूल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पापा पिंजारी व बंटी (पूर्ण माहित नाही) रा. हर्सूल फुलेनगर अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी मुबारक हुसेन बेग रा. उमर कॉलनी हर्सूल यांनी फिर्याद दिली. याप्रकरणी हर्सूल पोलीस पुढील तपास करीत आहेत.
नक्की वाचा - Pratap Sarnaik: '...तर मी टोलनाका फोडणार', परिवहन मंत्र्यांचा रौद्रावतार; ठेकेदाराला दिला सज्जड दम!
भावावर कटरने हल्ला...
घरगुती वादातून भावाने भावावरच कटरने हल्ला केल्याची घटना हनुमान नगर चौकातील विधाता हॉटेलसमोर घडली. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विनोद सुखदेव माळेकर (वय 29) रा. भारतनगर गल्ली नंबर 10 असे आरोपीचे नाव आहे. या प्रकरणी दिलीप सुखदेव माळेकर रा. भारतनगर यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार घरगुती कारणावरून आरोपीने फिर्यादीच्या डाव्या बाजूच्या मानेवर, डाव्या गालावर, हाताच्या कोपऱ्यावर व कमरेवर जीवे मारण्याचे उद्देशाने कटरन हल्ला केला. याप्रकरणी पुंडलिक नगर पोलीस पुढील तपास करीत आहेत.
क्षुल्लक कारणावरुन जीवघेणा हल्ला..
रमाई जयंतीच्या दिवशी काय म्हणत होता, असे विचारत दोघांनी एकाच्या बरगडीत चाकू खुपसून तोंडावर ब्लेडने हल्ला केल्याची घटना विठ्ठल चौक मुकुंदवाडी परिसरात घडली. या प्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आदर्श उपदेश (रा. संजयनगर मुकुंदवाडी) व सुमित साळवे उर्फ सोनू (रा. संजयनगर गल्ली नंबर 15) अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी सुमित राहुल पंडित रा. रामनगर दराडे यांच्या घरात किरायाने मुकुंदवाडी यांनी फिर्याद दिली.
नक्की वाचा - अभिनेते राहुल सोलापूरकर यांची अखेर दिलगिरी! शिवाजी महाराजांवरील वक्तव्यावर स्पष्टीकरण
दोन हजारांसाठी मारहाण...
दोन हजार रुपये देण्यास नकार दिल्याने पोटात चाकू खुपसल्याची घटना टोकी ता.गंगापूर येथे घडली. या प्रकरणी वाळूज एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अजय शेजवळ, अमोल पाचवणे, सचिन काळे अशी आरोपींची नावे आहेत. या प्रकरणी अनिकेत भीमराव शेजवळ रा. टोकी ता.गंगापूर यांनी फिर्याद दिली. फिर्यादीनुसार 9 फेब्रुवारी रात्री आठ वाजता सुमारास फिर्यादी गावातील बौद्ध विहारा समोर असताना आरोपींनी फोन करून त्यांना बोलवून घेतले. दोन हजार रुपयाची मागणी करून केली. पैसे न दिल्याने मारहाण करीत पोटात चाकू मारून गंभीर जखमी केले. याप्रकरणी वाळुज एमआयडीसी पोलीस पुढील तपास करीत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world