जाहिरात

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! भररस्त्यात तरुणीसोबत 15 मिनिटं भयंकर कृत्य,पाहा धक्कादायक VIDEO

Chhatrapati Sambhajinagar Crime: छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे.

Chhatrapati Sambhajinagar: संभाजीनगर हादरलं! भररस्त्यात तरुणीसोबत 15 मिनिटं भयंकर कृत्य,पाहा धक्कादायक VIDEO
छत्रपती संभाजीनगर:

Chhatrapati Sambhajinagar Crime:  छत्रपती संभाजीनगरमध्ये एका तरुणीसोबत घडलेल्या धक्कादायक प्रकारामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली आहे. नागेश्वरवाडी सारख्या मध्यवर्ती भागात भररस्त्यात एका नराधमाने तरुणीशी गैरवर्तन केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज आता सोशल मीडियावर व्हायरल झाले असून महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

काय आहे प्रकरण?

या प्रकरणात मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना 31 जानेवारीच्या रात्री साधारण 3:27 वाजता घडली आहे. नागेश्वरवाडी हा परिसर क्रांती चौक पोलीस स्टेशनच्या हद्दीत येतो. मध्यरात्रीच्या वेळी जेव्हा संपूर्ण रस्ते सामसूम होते, तेव्हा ही तरुणी तिथून जात होती. याचाच फायदा घेत एका तरुणाने तिला अडवले आणि तिच्याशी झटापट सुरू केली.

( नक्की वाचा : 'एक हसीना थी, एक दीवाना था'..हनिमूनहून परतताच पत्नीचा खळबळजनक कारनामा; चित्रपटालाही मागे टाकेल असा शेवट! )

CCTV कैद झाला थरार

या घटनेचे जे सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे, ते अत्यंत अस्वस्थ करणारे आहे. व्हिडिओमध्ये स्पष्ट दिसत आहे की, हा तरुण त्या तरुणीला भररस्त्यात ओढत आहे आणि तिच्यासोबत जबरदस्ती करण्याचा प्रयत्न करत आहे. ती तरुणी स्वतःची सुटका करून घेण्यासाठी 15 मिनिटांहून अधिक काळ संघर्ष करत होती. मात्र, परिसरात कोणीही नसल्यामुळे तो नराधम तिच्यासोबत गैरवर्तन करत राहिला.

रात्रीच्या शांततेचा फायदा घेत या तरुणाने केलेल्या या कृत्यामुळे स्थानिक नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त केला जात आहे. मध्यवर्ती भागात जर अशा घटना घडत असतील, तर महिलांनी रात्रीच्या वेळी बाहेर पडायचे कसे, असा सवाल आता नागरिक विचारत आहेत.

( नक्की वाचा : Pune News: पुण्यात मध्यरात्री काय घडलं? प्रियकराचा काटा काढण्यासाठी आईने पोटच्या गोळ्यालाच दिली 'सुपारी' )
 

पोलिसांकडून तपास सुरू

क्रांती चौक पोलिसांनी या घटनेची गंभीर दखल घेतली आहे. सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसणाऱ्या त्या तरुणाचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी पथके तैनात केली आहेत. अद्याप या प्रकरणात त्या तरुणीची किंवा आरोपीची ओळख पटलेली नाही. पोलीस सध्या त्या परिसरातील इतर सीसीटीव्ही फुटेज देखील तपासत आहेत जेणेकरून आरोपी कोणत्या दिशेला गेला याचा सुगावा लागू शकेल.

या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर पोलिसांनी पीडित तरुणीचा शोध घेण्याचे कामही सुरू केले आहे. तिचा शोध लागल्यानंतर याप्रकरणी अधिकृत तक्रार नोंदवून पुढील कायदेशीर कारवाई केली जाणार आहे. छत्रपती संभाजीनगर सारख्या शहरात घडलेल्या या घटनेने कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

इथे पाहा VIDEO

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com