Chhatrapati Sambhajinagar News : 'उपरवाला सब देख रहा है'; बारावीच्या पेपरदरम्यान प्रशासनाचं सर्जिकल स्ट्राईक 

मराठवाड्यातील दोन ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला. एक बीडमध्ये तर दुसरा छत्रपती संभाजीनगरमध्ये. 

जाहिरात
Read Time: 2 mins

Chhatrapati Sambhajinagar News : आजपासून महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाची बारावीच्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. आज इंग्रजीचा पहिला पेपर होता. यावेळी मराठवाड्यातील दोन ठिकाणी धक्कादायक प्रकार समोर आला. एक बीडमध्ये तर दुसरा छत्रपती संभाजीनगरमध्ये. 

विद्यालयात चाललेल्या गैरप्रकारावर जिल्हा प्रशासनाचं सर्जिकल स्ट्राईक

छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील शिक्षण क्षेत्रात आज एका मोठ्या कारवाईने खळबळ उडाली आहे. बारावीच्या इंग्रजी पेपर दरम्यान कन्नड तालुक्यातील जैतापूर येथील राष्ट्रीय उच्च माध्यमिक विद्यालयात चाललेल्या गैरप्रकारावर जिल्हा प्रशासनाने सर्जिकल स्ट्राईक केला आहे. दक्षता समितीच्या आदेशानुसार करण्यात आलेली ही आजवरची सर्वात मोठी कारवाई मानली जात असून यामध्ये केंद्र संचालकासह एकूण १९ जणांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे.

नक्की वाचा - Beed Video :विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांची धावाधाव; HSC परीक्षेच्या पहिल्याच दिवशी धक्कादायक चित्र

या संपूर्ण कारवाईचं वैशिष्ट्य म्हणजे 'सीसीटीव्ही फुटेज'. परीक्षेत कॉपी होणार नाही याची जबाबदारी असलेल्या पर्यवेक्षकांच्या डोळ्यादेखत विद्यार्थी एकमेकांच्या उत्तरपत्रिका पाहून लिहित होते. मात्र, मानवी डोळ्यांनी दुर्लक्ष केले तरी तंत्रज्ञानाने हा सर्व प्रकार टिपला. "उपरवाला सब देख रहा है" या म्हणीचा प्रत्यय देत, सीसीटीव्ही फुटेज आणि उत्तरांच्या झेरॉक्स प्रतींच्या आधारे हा गैरप्रकार पुराव्यासह सिद्ध करण्यात आला.

बीडमधील धक्कादायक चित्र..

बीड जिल्ह्यातील चौसाळा येथील एका महाविद्यालयात आज बारावीच्या परीक्षेच्या पहिल्याच दिवशी कॉपीमुक्त परीक्षेच्या दाव्यांची पोलखोल झाली. इंग्रजी विषयाच्या परीक्षेदरम्यान विद्यार्थ्यांना कॉपी पुरवण्यासाठी पालकांनी थेट परीक्षा केंद्राबाहेर गर्दी केल्याचे धक्कादायक चित्र समोर आले आहे. विशेष म्हणजे हा संपूर्ण प्रकार शिक्षण विभागाने तैनात केलेल्या ड्रोन कॅमेऱ्यात कैद झाला आहे.
 

Advertisement