
छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यातील बैनपल्ली गावचे उपसरपंच मुचाकी रामा यांची नक्षलवाद्यांनी हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात खळबळ उडाली आहे. सुकमा पोलिसांनी या हत्येची माहिती दिली. ही घटना सुकमाच्या बेनपल्ली गावातील आहे. जागरगुंडा पोलीस स्टेशन हद्दीत येणाऱ्या या गावात रात्री तीन वाजता नक्षलवाद्यांनी उपसरपंचाची हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नक्षलवाद्यांना सोमवारी रात्री उशीरा त्यांची हत्या केली.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
मध्यरात्री केलं अपहरण...
प्राथमिक तपासानुसार, मध्यरात्री नक्षलवादी बेनपल्ली गावात राहणारे उपसरपंच मुचाकी राम यांच्या घरी गेले. त्यांनी गावकऱ्यांची वेशभूषा केली होती. त्यांनी घराबाहेरून राम यांना आवाज दिला आणि जबरदस्तीने त्याला सोबत घेऊन गेले. पोलिसांनी सांगितलं की, नक्षलवाद्यांनी मुचाकी रामची हत्या केली. घटनेच्या काही वेळावंतर उपसरपंचाचा मृतदेह मिळाला. पोलिसांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. यासोबत संपूर्ण परिसरात अलर्ट जारी करण्यात आलं आहे.
नक्की वाचा - Beed Crime : एसपींच्या घरातच पोलीस कर्मचाऱ्याचं 'दम मारो दम'; बीड जिल्हा पुन्हा वादात
या वर्षातील नववी हत्या...
पोलिसांनी दिलेल्या आकडेवारीनुसार, नक्षलवाद्यांनी केलेल्या हिंसाचारात गेल्यावर्षी 68 नागरिकांचा मृत्यू झाला होता. अशात नक्षलवाद संपविण्यासाठी केंद्र सरकारने छत्तीसगढमध्ये ऑपरेशन चालवलं होतं. या ऑपरेशन अंतर्गत अनेक नक्षलवाद्यांनी सरेंडरही केलं आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world