जाहिरात

Beed Crime : एसपींच्या घरातच पोलीस कर्मचाऱ्याचं 'दम मारो दम'; बीड जिल्हा पुन्हा वादात

बीड पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडले आहे.

Beed Crime : एसपींच्या घरातच पोलीस कर्मचाऱ्याचं 'दम मारो दम'; बीड जिल्हा पुन्हा वादात

आकाश सावंत, प्रतिनिधी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची अत्यंत क्रूरपणे हत्या केल्यानंतर बीड जिल्ह्यातील गुन्हेगारीबद्दल अनेर सवाल उपस्थित करण्यात आले होते. यानंतरही बीडमधील अनेक घटना समोर आल्या ज्यातून बीडचा बिहार होत असल्याची चिंता व्यक्त करण्यात येत होती. 

बीड जिल्ह्यात गुन्हेगारी आणि व्यसनाधीनतेचं प्रमाण वाढत आहे. त्यातच बीड पोलीस दल गेल्या काही दिवसांपासून वेगवेगळ्या कारणांनी वादात सापडले आहे. वाळूमाफियाला मदत केल्याने हवालदाराला अटक केल्याचं प्रकरण ताजे असताना सुरक्षेसाठी नियुक्त केलेल्या पोलीस कर्मचाऱ्याने पोलीस अधीक्षकांच्या निवासस्थानीच गांजाची नशा केल्याचा प्रकार समोर आला आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

बाळू गहिणीनाथ बहिरवाळ असं नशा करणाऱ्या पोलिसाचं नाव आहे. पोलीस अधीक्षक नवनीत काँवत यांच्या निवासस्थानी तीन सुरक्षा रक्षक नियुक्त होते. यात बहिरवाळ यांचाही समावेश होता. काँवत यांचे अंगरक्षक गणेश थापडे हे या सुरक्षा रक्षकांकडे गेले. यावेळी बहिरवाळ हे नशेत असल्याचे दिसले. त्यांनी पोलिस मुख्यालयाचे निरीक्षक पांडुरंग दलाई यांना कळविले. तसेच शिवाजीनगर पोलिसांनाही पाचारण केले. बहिरवाळ यांची अंगझडती घेतली असता गांजा ओढण्याचे साहित्य दिसले. तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता त्यांनी अमली पदार्थ सेवन केल्याचा अहवाल समोर आला. त्यावरून उपनिरीक्षक सतीश बोंदरे यांनी तक्रार दिली.

Private Travels Bus : तुम्हीही खासगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करता? प्रवाशांचा धक्कादायक अनुभव

नक्की वाचा - Private Travels Bus : तुम्हीही खासगी ट्रॅव्हल्स बसने प्रवास करता? प्रवाशांचा धक्कादायक अनुभव

काय केली कारवाई?

मागील काही दिवसांपासून सामान्यांपेक्षा पोलीस दलातीलच अधिकारी, कर्मचारी वादग्रस्त ठरत आहेत. यापूर्वी रणजित कासले याच्या कारनाम्याने त्याला बडतर्फ करण्यात आले होते. पोलीस निरीक्षक नागरगोजे यांनी एसपींशीच उद्धट वर्तन केल्याने त्यांचीही सेवेतून हकालपट्टी करण्यात आली.

दोन दिवसांपूर्वी हवालदारानेच वाळूमाफियाला मदत केली. असे एक ना अनेक प्रकार मागील चार महिन्यांत घडले आहेत. त्यांच्यावर निलंबनाची कारवाई झाली असली तरी पोलीस दलातील काही लोक अजूनही सुधारत नसल्याचे यावरून दिसत आहे. याप्रकरणी गांजा ओढणाऱ्या पोलीस कर्मचाऱ्याविरोधात शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com