जाहिरात

Crime News: कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, शेतात नेत शेजाऱ्यानेच अल्पवयीन तरुणीबरोबर...

अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला परत घरी सोडले. घरी आल्यानंतर ती शांत होती. घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली.

Crime News: कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने कारमध्ये बसवलं, शेतात नेत शेजाऱ्यानेच अल्पवयीन तरुणीबरोबर...
पनवेल:

प्रथमेश गडकरी

ती त्याच्या शेजारी राहात होती. तिचं वय अवघं 15 वर्षाचं होतं. तिच्यावर मात्र त्याची वाईट नजर होती. तो संधीच्या शोधात होता. शेवटी त्याने संधी साधली आणि या 15 वर्षीय अल्पवयीन तरुणीवर अत्याचार केले. ही घटना पनवेलमध्ये घडली. यामुळे परिसरात खळबळ उडाली आहे. या प्रकरणी आरोपी तरुणाला अटक करण्यात आले आहे. हा तरुणी आणि पीडित तरुणी हे ओळखीचे होते. शिवाय ते एकमेकांच्या शेजारी राहाणारे होते. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

पनवेल येथे एक घृणास्पद आणि धक्कादायक घटना घडली आहे. एका मारुती स्कुल व्हॅन चालकाने 15 वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी हा पीडितेच्या शेजारीच राहत होता. त्यामुळे या दोघांचाही चांगला परिचय होता. या ओळखीचा गैरफायदा आरोपीने घेतला. 

ट्रेंडिंग बातमी - Beed News: लेकीसाठी काळीज पिळवटणारी FB पोस्ट, 6 राक्षसांची नावे; शिक्षकाच्या मृत्यूने बीड हादरलं!

त्याची तिच्यावर वाईट नजर पहिल्यापासून होती. आरोपीने संधी साधत पीडितेला कॉलेजला सोडण्याच्या बहाण्याने आपल्या गाडीत बसवले. त्यानंतर कॉलेजला नेण्या ऐवजी तो तिला घरापासून दूर चिंचवली इथं घेवून गेला. तिथं असलेल्या एका शेता शेजारी त्याने गाडीमध्येच तरुणीवर अत्याचार केले. तरुणी या सर्व गोष्टीने घाबरून गेली होती. काय करावे हे तिला समजत नव्हते. कुणाला काही बोलली तर ठार मारेन अशी धमकी तिला देण्यात आली होती. त्यामुळे ती शांत राहीली. 

ट्रेंडिंग बातमी - Gujarat Accident : 'मी नशेत नव्हतो, पण...' बडोदा अपघाताच्या आरोपीची धक्कादायक कबुली

अत्याचार केल्यानंतर आरोपीने तिला परत घरी सोडले. घरी आल्यानंतर ती शांत होती. घरच्यांनी तिच्याकडे चौकशी केली. त्यानंतर तिने तिच्या बरोबर झालेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला. त्यानंतर तिच्या कुटुंबाने तिला घेवून पोलीस स्थानक गाठले. पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपीला अटक केली.त्याच्यावर इतर कलमांसाहित POSCO कायद्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला 18 तारखेपर्यंत पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस करत आहेत.