जाहिरात

Crime news: अडीच लाख रुपये, लग्नाचा तगादा, केसची धमकी अन हत्या, महिलेच्या हत्येची इनसाईड स्टोरी

हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे आहे. ती अंबरनाथच्या बारूपाडा इथं राहाणारी आहे.

Crime news: अडीच लाख रुपये, लग्नाचा तगादा, केसची धमकी अन हत्या, महिलेच्या हत्येची इनसाईड स्टोरी
अंबरनाथ:

निनाद करमरकर 

भर दिवसा एका महिलेचा हत्या केल्याची घटना घडली आहे. ही घटना अंबरनाथ शहरात घडली. शहरातील हुतात्मा चौकाकडून भीमनगरकडे जाणाऱ्या साईबाबा मंदिराजवळ ही हत्या झाली. त्यामुळे एकच खळबळ उडाली आहे. हत्या झालेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे असल्याचे समजत आहेत. विशेष म्हणजे हत्या झाली त्यावेळी तिथे काही जण हजर होते. त्यांनी डोळ्या देखत लाईव्ह हत्या पाहिली. त्यांनी हल्लेखोराला रोखण्याचा प्रयत्न केला. पण त्यांनाही हल्लोखोराने धमकावले. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

अंबरनाथच्या बारकूपाडा भोईर चाळ परिसरात शेजारी राहणारे सीमा कांबळे आणि राहुल भिंगारकर यांची मैत्री होती. सीमाचा नवरा तिला सोडून गेल्यानं ती 13 वर्षांच्या मुलीसोबत एकटीच राहत होती. बेबी सिटिंगमध्ये काम करणाऱ्या सीमानं राहुल याच्याशी असलेल्या मैत्रीतून त्याला अडीच लाख रुपये उसने दिले होते. मात्र ते पैसे तो तिला परत करू शकत नव्हता. त्यावर  तिने माझ्याशी लग्न कर किंवा माझे पैसे परत कर, असा तगादा लावला होता. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

तसंच लग्न केलं नाही तर बलात्काराची केस करण्याची धमकी तिने राहुलला दिली होती. या दुहेरी कात्रीत सापडलेल्या राहुलनं अखेर सीमाचा काटा काढायचं ठरवलं. सीमाला अंबरनाथ स्टेशनच्या भीमनगर परिसरातील साईबाबा मंदिराशेजारच्या पायऱ्यांवर तो भेटला. तिथे दोघांमध्ये वाद झाला आणि राहुलने सीमावर चाकूने सपासप अनेक वार करत तिथून पळ काढला. यानंतर तो स्वतः जाऊन पोलिसांसमोर हजर झाला, असं सांगितलं जात आहे. 

ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime News: 'जामीन झाला नाही तर एके 47 घेऊन येतो' आधी अन्यायनंतर धमकी

दुसरीकडे गंभीर जखमी अवस्थेतील सीमाला लोकांनी उचलून जवळच्या खासगी रुग्णालयात नेलं. मात्र तिचा तिथे मृत्यू झाला होता. सीमाच्या पोटावर, ओटीपोटाकर, मांडीवर आणि मुख्य म्हणजे छातीवर वर्मी घाव करण्यात आला होता. यामुळे ती वाचू शकली नाही. या घटनेनंतर शिवाजीनगर पोलिसांनी घटनास्थळी  धाव घेत पंचनामा सुरू केला. तर दुसरीकडे राहुल भिंगारकर याचीही पोलिसांनी चौकशी सुरू केलीये. या संपूर्ण घटनेमुळे अंबरनाथ शहरात खळबळ उडाली आहे.

ट्रेंडिंग बातमी - KDMC की भ्रष्टाचाराचा बाजार? दीड लाखाची लाच घेताना लिपीक गळाला, 2 बडे अधिकारीही अडकणार

हत्या करण्यात आलेल्या महिलेचे नाव सीमा कांबळे आहे. ती अंबरनाथच्या बारूपाडा इथं राहाणारी आहे.  या घटनेनंतर शहरात एकच खळबळ उडाली आहे. याबाबत पोलीस अधिक तपास करत आहेत. याघटने मुळे सीमाची मुलगी मात्र पोरकी झाली आहे. विश्वास ठेवून अडीच लाख रूपये दिले. पण आपण फसत आहोत हे लक्षात आल्यावर जाब मागणाऱ्या सीमाच्या पदरी मात्र भयंकर घडलं. तिला आपला जीव गमवावा लागला.   

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us: