![घरच्यांचा विरोध, तरीही दोघांनी लग्न केलं; अवघ्या 6 महिन्यात नवऱ्याने बायकोला संपवलं घरच्यांचा विरोध, तरीही दोघांनी लग्न केलं; अवघ्या 6 महिन्यात नवऱ्याने बायकोला संपवलं](https://c.ndtvimg.com/2024-06/olj5u4a8_police-generic-image_625x300_18_June_24.jpg?im=FitAndFill,algorithm=dnn,width=773,height=435)
घरच्यांचा विरोध झुगारुन दोघांनी लग्न केलं. लग्नानंतरही घरच्यांच्या विरोधामुळे दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. मात्र आयुष्यभर एकत्र राहण्याची स्वप्ने पाहणाऱ्या दोघांचंही आयुष्य अवघ्या सहा महिन्यातच उद्ध्वस्त झालं. पत्नीच्या एकत्र राहण्याच्या हट्टामुळे संतापलेल्या नवऱ्याने पत्नीची हत्या केली. एखाद्या सिनेमाच्या गोष्टीप्रमाणे वाटणारी ही घटना दिल्लीत घडली आहे. आरोपी पतीला पोलिसांनी अटक केली आहे.
( 'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा )
याबाबत सविस्तर माहिती अशी की, दिल्लीच्या राजौरी गार्डन परिसरात राहणाऱ्या गौतम आणि मान्या यांनी सहा महिन्यांपूर्वीच प्रेम विवाह केला होता. दोघांच्याही घरच्यांचा या लग्नाला विरोध होता. मात्र घरच्यांचा विरोध झुगारून दोघांनी लग्न केले. घराच्यांच्या विरोधामुळे दोघेही वेगवेगळे राहू लागले.
(नक्की वाचा - IAS पूजा खेडकर सारखे 359 अधिकारी रडारवर?, संपूर्ण यादी NDTV मराठीच्या हाती)
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघेही एकमेकांपासून वेगळे राहत होते. रविवारी दोघांची भेट झाली. त्यावेळी मान्याने गौतमकडे एकत्र राहण्याचा हट्टा केला. मात्र सततच्या भांडणामुळे कंटाळलेल्या गौतमचा संयम तुटला. गौतमने मान्याची धारधार शस्त्राने वार करुन हत्या केली. कारमध्येच गौतमने मान्याची हत्या केली.
(नक्की वाचा- 35 सेकंदात खेळ खल्लास, वनराज निवांत उभा होता अन्...; पुण्यातील गँगवॉरचा Live Video)
गौतमीने कार पार्क करुन घटनास्थळावरुन पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र रात्रीच्या वेळी ड्युटीवर असलेल्या पोलीस कॉन्स्टेबलच्या सतर्कतेमुळे गौतम जाळ्यात सापडला. पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, हत्येनंतर मृतदेहाची विल्हेवाट लावल्यानंतर आरोपी फरार होण्याच्या तयारीत होता. रात्री उशीरा 1.20 च्या सुमारास तेथे तैनात असलेल्या हेड कॉन्स्टेबलला एक व्यक्ती कपड्यांशिवाय फिरताना दिसली. यावेळी त्याच्या हालचाली संशयास्पद वाटल्या. हेड कॉन्स्टेबलने त्या व्यक्तीला पकडून पोलीस ठाण्यात याबाबत माहिती दिली. पोलीस तातडीने घटनास्थळी दाखल झाले आणि गौतमला ताब्यात घेतलं. पोलीस याबाबत अधिक तपास करत आहेत.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world