जाहिरात

Commando Murder: सुरक्षेचे धडे देणाऱ्या SWAT कमांडोची घरच्या युद्धात हार; एका डंबेलने उद्ध्वस्त केला संसार!

Delhi SWAT Commando Kajal Chaudhary Killed by Husband:  जी महिला कमांडो शत्रूच्या मोठ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षित होती, तिला आपल्याच घरात पतीने केलेल्या हल्ल्यापासून जीव वाचवता आला नाही.

Commando Murder: सुरक्षेचे धडे देणाऱ्या SWAT कमांडोची घरच्या युद्धात हार; एका डंबेलने उद्ध्वस्त केला संसार!
Delhi Murder: ही महिला चार महिन्यांची गर्भवती होती. पोटातील बाळासह तिने या जगाचा निरोप घेतला आहे.
मुंबई:

Delhi SWAT Commando Kajal Chaudhary Killed by Husband:  एका बाजूला देशाच्या सुरक्षेसाठी अहोरात्र तैनात राहणारी 'कमांडो' आणि दुसरीकडे तिच्याच घरात दबा धरून बसलेला तिचा काळ, अशा एका थरारक आणि तितक्याच दुर्दैवी घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. जी महिला कमांडो शत्रूच्या मोठ्या हल्ल्यांना तोंड देण्यासाठी प्रशिक्षित होती, तिला आपल्याच घरात पतीने केलेल्या हल्ल्यापासून जीव वाचवता आला नाही. विशेष म्हणजे, ही महिला चार महिन्यांची गर्भवती होती आणि आपल्या पोटातील बाळासह तिने या जगाचा निरोप घेतला आहे.

काय आहे प्रकरण?

ही धक्कादायक घटना देशाची राजधानी असलेल्या दिल्लीमध्ये घडली आहे.दिल्ली पोलीस दलातील स्वात (SWAT) टीममध्ये कार्यरत असलेल्या 27 वर्षांच्या काजल चौधरी यांची त्यांच्या पतीने डंबेलने डोक्यात प्रहार करून निर्घृण हत्या केली. काजल या 22 जानेवारी रोजी आपल्या भावाशी फोनवर बोलत असतानाच त्यांच्यावर हा प्राणघातक हल्ला झाला आणि मंगळवारी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला.

काय होते कारण?

काजल यांचे पती अंकुर हे संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून काम करतो. 22 जानेवारी रोजी या दोघांमध्ये आर्थिक विषयावरून जोरदार वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की रागाच्या भरात अंकुरने घरातील जड डंबेल उचलले आणि काजल यांच्या डोक्यात घातले. काजल यांचा भाऊ निखिल, जो स्वतः पोलीस दलात कॉन्स्टेबल आहे, त्याने सांगितले की तो फोनवर काजलशी बोलत असतानाच तिला मारहाण सुरू झाली आणि काही वेळातच अंकुरने स्वतः फोनवर या हल्ल्याची माहिती दिली.

( नक्की वाचा : Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा )

या हत्येमागे केवळ राग नसून हुंड्यासाठी केलेला छळ कारणीभूत असल्याचा आरोप काजल यांच्या माहेरच्यांनी केला आहे. काजल यांची सासू आणि दोन नणंद हुंड्यासाठी त्यांचा सतत मानसिक आणि शारीरिक छळ करत होत्या. इतकेच नाही तर आरोपी अंकुरने काजलच्या पालकांकडून वेळोवेळी पैसेही घेतले होते. एका बाजूला वर्दीतील कर्तव्याचा ताण आणि दुसरीकडे सासरचा छळ अशा दुहेरी संघर्षात काजल अडकल्या होत्या.

तपासाची चक्रे आणि अटक

काजल चौधरी 2022 मध्ये पोलीस दलात भरती झाल्या होत्या आणि 2023 मध्ये त्यांचा विवाह झाला होता. त्यांना दीड वर्षांचा एक मुलगाही आहे. काजल यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी अंकुरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल केला असून त्याला अटक करण्यात आली आहे. न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावली असून पोलीस आता या प्रकरणाचा सखोल तपास करत आहेत.
 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com