जाहिरात

Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य हादरले आहे. बारामती येथील विमानतळावर झालेल्या या भीषण अपघाताबाबत आता अत्यंत धक्कादायक आणि तांत्रिक माहिती समोर येत आहे.

Ajit Pawar: विमानाची ती सुरक्षा यंत्रणा आणि 28 दिवसांची डेडलाईन; अजित पवारांच्या अपघाताबाबत सर्वात मोठा खुलासा
Ajit Pawar Plane Crash : अजित पवारांच्या विमान अपघाताबाबत अत्यंत धक्कादायक आणि तांत्रिक माहिती समोर येत आहे.
मुंबई:

Ajit Pawar Plane Crash : उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनाने संपूर्ण राज्य हादरले आहे. बारामती येथील विमानतळावर झालेल्या या भीषण अपघाताबाबत आता अत्यंत धक्कादायक आणि तांत्रिक माहिती समोर येत आहे. ज्या विमानाने अजित पवार प्रवास करत होते, त्या विमानात  सॅटेलाईटवर आधारित अद्ययावत सुरक्षा यंत्रणा असती, तर कदाचित हा अपघात टळला असता. विशेष म्हणजे, एका सरकारी नियमाच्या डेडलाईनपासून हे विमान केवळ 28 दिवस आधी रजिस्टर झाले होते, ज्यामुळे त्यात ही यंत्रणा बसवणे कायदेशीररित्या बंधनकारक नव्हते.

काय आहे ती गगन यंत्रणा आणि तांत्रिक अडचण?

भारताने कमी दृश्यमानता असलेल्या काळात विमानांना सुरक्षित लँडिंगसाठी मदत व्हावी म्हणून गगन (GAGAN - GPS Aided Geo Augmented Navigation) ही स्वतःची सॅटेलाईट आधारित यंत्रणा विकसित केली आहे. मोठ्या विमानतळांवर आयएलएस (ILS) नावाची यंत्रणा असते, जी धुक्यात किंवा पावसात वैमानिकांना धावपट्टीचा रस्ता दाखवते. 

( नक्की वाचा : Ajit Pawar Death : अजित पवारांच्या मृत्यूनंतर 5 बदल अटळ, फडणवीस ते शरद पवार सर्वांची कशी वाढणार डोकेदुखी ? )
 

मात्र बारामतीसारख्या छोट्या विमानतळांवर अशी महागडी यंत्रणा नसते. अशा वेळी गगन यंत्रणा सॅटेलाईटच्या मदतीने वैमानिकाला अचूक मार्गदर्शन करते. अजित पवार यांचे विमान 16 वर्षे जुने होते आणि ते 2 जून 2021 रोजी भारतात रजिस्टर झाले होते. भारताने 1 जुलै 2021 पासून सर्व नवीन विमानांना गगन यंत्रणा अनिवार्य केली होती. हे विमान केवळ 28 दिवस आधी रजिस्टर झाल्यामुळे तांत्रिकदृष्ट्या ते जुन्या पद्धतीचेच राहिले.

अपघाताच्या त्या अखेरच्या मिनिटांत नक्की काय घडले?

बुधवारी सकाळी बारामती विमानतळावर लँडिंगच्या वेळी दृश्यमानता अत्यंत कमी होती. सिव्हिल एव्हिएशन मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, सकाळी 8 वाजून 18 मिनिटांनी विमानाचा संपर्क झाला होता. तेव्हा दृश्यमानता साधारण 3,000 मीटर होती. वैमानिकाने पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला, पण धावपट्टी दिसत नसल्याने त्यांनी गो-अराउंड (पुन्हा हवेत जाण्याचा निर्णय) घेतला. 

दुसऱ्यांदा प्रयत्न करताना 8 वाजून 43 मिनिटांनी वैमानिकाने धावपट्टी दिसत असल्याचा संदेश दिला आणि लँडिंगची परवानगी घेतली. मात्र, त्यानंतर केवळ एका मिनिटात म्हणजेच 8 वाजून 44 मिनिटांनी धावपट्टीजवळ आगीच्या ज्वाळा दिसल्या. हे विमान धावपट्टीच्या कडेपासून साधारण 100 मीटर अंतरावर कोसळले आणि त्याला आग लागली.

( नक्की वाचा : Ajit Pawar Death: अजितदादांच्या प्लेन क्रॅशचा आणखी एक Live Video, विमान हवेत डगमगले आणि नंतर झाला आगीचा गोळा )

शरद पवारांचं आवाहन

अजित पवार यांच्या निधनामुळे महायुती सरकारला मोठा धक्का बसला आहे. महाराष्ट्राच्या राजकारणात दादा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या 66 वर्षीय नेत्याच्या जाण्याने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या भवितव्यावरही प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. या घटनेनंतर त्यांचे काका आणि राष्ट्रवादीचे संस्थापक शरद पवार यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे. हा अपघात अत्यंत दुर्दैवी असून याचे राजकारण केले जाऊ नये, असे आवाहन त्यांनी केले आहे. सध्या या संपूर्ण प्रकरणाची तांत्रिक चौकशी सुरू असून, विमानातील सुरक्षेच्या त्रुटींवर आता तज्ज्ञांकडून बोट ठेवले जात आहे.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com