जाहिरात

महाराष्ट्रानंतर दिल्लीही हादरली; आर्मी अधिकाऱ्याच्या नावाखाली महिला डॉक्टरला अडकवलं; धक्कादायक प्रकार उघड

Delhi Crime News: भारतीय सैन्यात लेफ्टनंट असल्याचं सांगत आरोपीने महिला डॉक्टरचं शारिरीक शोषण केलं.

महाराष्ट्रानंतर दिल्लीही हादरली; आर्मी अधिकाऱ्याच्या नावाखाली महिला डॉक्टरला अडकवलं; धक्कादायक प्रकार उघड
Delhi Police (File Photo)

Female Doctor assult case : साताऱ्यातील फलटणमधील एका महिला डॉक्टरने आत्महत्या केली. तिच्यावर चार वेळा बलात्कार करण्यात आल्याचं महिला डॉक्टरने सुसाइड नोटमध्ये म्हटलं आहे. महाराष्ट्रातील ही घटना ताजी असताना दिल्लीतील एका महिला डॉक्टरच्या फसवणुकीचा प्रकार समोर आला आहे. 

आरोपीने सैन्याचा अधिकारी असल्याचं दाखवित महिला डॉक्टरची फसवणूक केली आणि तिच्यावर अत्याचार केला. दिल्लीच्या छतरपूरचा रहिवासी असलेल्या तरुणाने स्वत:ला भारतीय सैन्याचा लेफ्टनंट असल्याचं सांगत सफदरजंग रुग्णालयात काम करणाऱ्या एका महिला डॉक्टरवर बलात्कार केला. आरोपीचं नाव आरव असून तो डिलिव्हरी बॉयचं काम करतो. तो सैन्यामध्ये लेफ्टनंट असल्याचं सांगत महिला डॉक्टरवर प्रभाव पाडण्याचा प्रयत्न करीत होता. यातून त्याला डॉक्टरवर बलात्कार केला. 

Satara Doctor Death : 'महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या'; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

नक्की वाचा - Satara Doctor Death : 'महिला डॉक्टरची आत्महत्या नसून संस्थात्मक हत्या'; बड्या नेत्याच्या दाव्याने खळबळ

सैन्याचा अधिकारी निघाला डिलिव्हरी बॉय...

मिळालेल्या माहितीनुसार, डॉक्टर आणि आरोपीची ओळख इन्स्टाग्रामवर झाली होती. तेथून दोघांमध्ये बातचीत सुरू झाली. यानंतर दोघांनी व्हॉट्सअॅप नंबरची अदलाबदल केली. यानंतर ते संपर्कात होते. आरोपीने स्वत:ला सैन्याचा अधिकारी असल्याचं सांगितलं होतं. त्याची पोस्टिंग काश्मिरमध्ये असल्याची खोटी माहिती त्याने महिला डॉक्टरला दिली होती. महिला डॉक्टरचा विश्वास संपादन करण्यासाठी त्याने सैन्याचा युनिफॉर्म घातलेला फोटो महिला डॉक्टरला पाठवला होता. ऑक्टोबर २०२५ मध्ये आरोपी डॉक्टरला भेटायला तिच्या घरी पोहोचला. या भेटीत आरोपीने खाण्याच्या पदार्थात नशेचं औषध टाकलं. आणि डॉक्टरची शुद्ध हरपल्यानंतर संधी साधत तिच्यावर बलात्कार केला आणि फरार झाला. पीडित डॉक्टर शुद्धीवर आल्यानंतर तिला हा सर्व प्रकार लक्षात आला. १६ ऑक्टोबरला तिने पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. 

या तक्रारीनंतर पोलिसांनी कारवाई करीत आरोपीला अटक केली. चौकशीदरम्यान आरवने सांगितलेली कहाणी ऐकून डॉक्टर महिलेला धक्काच बसला. आरोपीने कँटस्थित एका दुकानातून ऑनलाइन सैन्याची वर्दी खरेदी केली होती. याशिवाय तो डिलिव्हरी बॉयचं काम करीत असल्याचंही त्याने यावेळी सांगितलं. 


 

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com