Mumbai News : सोशल मीडियावर विविध प्रकारचे व्हिडिओ व्हायरल होत असतात. काही विनोदी रील आपण एन्जॉय करतो, मात्र काही व्हिडिओ हे चिंता वाढवणारे असतात. प्रसिद्धी, लाईक्ससाठी रीलस्टार कोणत्याही थराला जात असल्याचं समोर येत आहे. ही चिंता वाढवणारी बाब आहे. दरम्यान मुंबई लोकलमधील एक जीवघेणा स्टंटचा रील सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एक छोटीशी चूक घडली असती तर तरुणाचा जीव धोक्यात पडला असता.
धावत्या लोकलमधील जीवघेणा स्टंट...
सोशल मीडियावर प्रसिद्ध होण्याच्या हव्यासापायी एका तरुणाने मुंबई लोकलमध्ये जीवघेणा स्टंट केला आहे. डॉकयार्ड रोडजवळ धावत्या ट्रेनमध्ये स्टंट करतानाचा व्हिडिओ त्याने सोशलवर पोस्टही केला. काही वेळातच हा व्हिडिओ व्हायरल झाला. मात्र व्ह्यूज वाढवणारा हा व्हिडिओ त्याच्या अडचणीचं कारण ठरला आहे. या व्हिडिओनंतर RPF ने त्या तरुणाला अटक केली आहे. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्याने धक्कादायक बाब सांगितली. केवळ ‘लाइक्स' आणि प्रसिद्धीसाठी हा जीवघेणा स्टंट केल्याची कबुली त्याने दिली आहे. रेल्वे कायद्यानुसार कारवाई करत त्याला धडा शिकवण्यात आला. पोलिसांकडून कारवाई केल्यानंतर त्याने आपल्या चुकीची माफी मागितली असून कोणीही अशा प्रकारचे स्टंट करू नये अशी विनंती केली आहे.
तरुणांनी सोशल मीडियाला बळी पडून जीव धोक्यात घालणारे स्टंट करू नये असं पोलिसांकडूनही वारंवार सांगितलं जातं. काही लाइक्स आणि व्ह्यूजसाठी तुमचा जीव जाऊ शकतो. त्यामुळे रीलस्टार किंवा सर्वसामान्यांनीही अशा प्रकारांपासून दूर राहावं
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world
