जाहिरात

Dhule Crime: धाड, धाड.. भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या, धुळ्यात काय घडलं?

Dhule Crime News: या हल्ल्यात शाहरुखच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

Dhule Crime: धाड, धाड.. भरदिवसा तरुणावर गोळ्या झाडल्या, धुळ्यात काय घडलं?

 नागिनंद मोरे, धुळे: धुळे शहरातील शंभर फुटी रोड परिसरात आज दुपारी दिवसाढवळ्या गोळीबाराची खळबळजनक घटना घडली. जुन्या वादातून शाहरुख शहा बाबा शहा या तरुणावर गोळीबार करण्यात आल्याची घटना घडली आहे. या हल्ल्यात शाहरुखच्या पायाला गोळी लागून तो गंभीर जखमी झाला असून, त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

'NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा ) 

प्राथमिक माहितीनुसार, दोन गटांमध्ये पूर्वीपासून सुरू असलेल्या वादातून ही घटना घडल्याचे समोर आले आहे. वाद मिटवण्यासाठी दोन्ही बाजूंची चर्चा सुरू असताना अचानक बाचाबाची झाली. याच क्षणी एकाने गोळीबार केले. या गोळीबारात शाहरुख शहा बाबा शहा या तरुणाच्या पायाला गोळी लागली आहे. गोळीबार होताच परिसरात एकच गोंधळ उडाला.

घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अप्पर पोलीस अधीक्षक किशोर काळे आणि उपविभागीय पोलीस अधिकारी राजकुमार उपासे यांनी तत्काळ घटनास्थळी भेट दिली. चाळीसगाव रोड पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुरेशकुमार घुसर यांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला आहे.

नक्की वाचा - Vasai News : फिलिपिन्समध्ये पर्यटनासाठी गेलेल्या वसईतील दाम्पत्याचा अपघाती मृत्यू

फॉरेन्सिक पथकाला देखील घटनास्थळी पाचारण करण्यात आले असून, गोळीबारासाठी वापरलेले शस्त्र आणि आरोपीचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा केला असून, परिसरातील नागरिकांकडून माहिती गोळा केली जात आहे. आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथके रवाना करण्यात आली आहेत.

Amravati News: लग्नाच्या एक दिवस आधी काँग्रेस नेत्याचा मुलगा बेपत्ता, अमरावतीत खळबळ! पैसे काढले अन्...

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com