
अंबरनाथमध्ये मद्यधुंद ट्रेलर चालकाने राँग साईडने ट्रेलर चालवत पोलिसांच्या गाडीसह किमान 50 वाहनांना धडक दिल्याची घटना घडली आहे. या ट्रेलर चालकाला पोलीस आणि रिक्षाचालकांनी पाठलाग करत पकडलं.
('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअॅप चॅनल जॉईन करा)
अंबरनाथमधून जाणाऱ्या डोंबिवली बदलापूर पाईपलाईन रोडवर हा अपघात घडला. नेवाळी नाक्याकडून बदलापूरच्या दिशेनं निघालेल्या भरधाव ट्रेलरने नेवाळी नाक्यावर एका वाहनाला धडक दिली. त्यानंतर पालेगाव, अंबरनाथ आनंदनगर पोलीस चौकी, वैभव हॉटेल चौक, सुदामा हॉटेल चौक असा संपूर्ण रस्ता भरधाव वेगात राँग साईडने ट्रेलर चालवत हा चालक आला. वाटेत समोर येईल त्या वाहनांना त्याने धडक दिली. यात कार, दुचाकी, रिक्षा, इतकंच नव्हे तर पोलिसांच्याही गाडीचा समावेश होता. तर एका दुचाकी चालकाला त्याने रॉडने मारहाण करून जखमी केलं.
शिवाजीनगर पोलीस आणि रिक्षाचालक पाठलाग करत असल्यानं मद्यधुंद ट्रेलर चालकानं आनंदनगर एमआयडीसी परिसरात ट्रेलर घुसवला आणि अतिवेगामुळे ट्रेलर रस्त्याच्या कडेला जाऊन उलटला. यावेळी पोलिसांनी या ट्रेलर चालकावर झडप घालत त्याला बेड्या ठोकल्या. या धडकांमध्ये जीवितहानी झालेली नसली, तरी काही जण जखमी झाले असून किमान 50 गाड्यांचं नुकसान झाल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली आहे.
Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world