फी भरण्यासाठी पैसे नव्हते, इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याने नको तेच केले

सकाळी दुकानदार दुकानात आल्यानंतर त्याला मोबाईल दिसले नाहीत. त्याने सीसीटीव्ही पाहील्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले.

जाहिरात
Read Time: 2 mins
नवी मुंबई:

राहुल कांबळे 

परिस्थिती माणसाला काय करायला लावते याचे उत्तम उदाहरण पनवेलमध्ये समोर आले आहे. इथं एका इंजिनिअरींगच्या विद्यार्थ्याला फी भरण्यासाठी पैसे नव्हते. त्यामुळे त्यांने चोरीचा मार्ग अवलंबला. त्याने महागडे फोन चोरी केले. ते विकून तो आपली फी भरणार होता. पण त्या आधीच तो गडाआड झाला. हा आरोपी अभियांत्रिकीच्या शेवटच्या वर्षाला होता. चौकशीतून ही बाब समोर आली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

इंजिनिअरींगच्या शेवटच्या वर्षाला एक विद्यार्थी होता. त्याला शेवटच्या वर्षाची फी भरायची होती. पण त्याच्याकडे पैसे नव्हते. घरची स्थितीही तेवढी चांगली नव्हती. अशा वेळी काय करायचे असा विचार त्याच्या मनात आला. फी तर भरायची आहे. पण पैसे नाहीत. मग त्याच्या डोक्यात एक वाईट कल्पना आली. ती म्हणजे चोरी करायची. त्यातून पैसे कमवायचे. त्या पैशातून फी भरायची. 

ट्रेंडिंग बातमी - एक'नाथ' है तो सेफ है, सेना नेत्याच्या ट्वीटनं ट्विस्ट

मग कुठे चोरी करायची आणि कशी चोरी करायची याचा विचार तो करू लागला. त्यासाठी त्याने पनवेलमधले मोबाईलचे एक दुकान हेरले. ठरल्या प्रमाणे त्याने रात्रीच्या वेळी दुकानात प्रवेशही केला. ओळख पटू नये म्हणून त्याने डोक्यात हेल्मेट घातले. पाठीवर बॅग होती. चोरलेले मोबाईल ठेवण्यासाठी त्याने मोठी प्लास्टीकची पिशवी सोबत घेतली होती. तो एकएक करत सर्व मोबाईल गोळा करत असल्याचे सीसीटीव्ही मध्ये दिसत आहे. असे त्याने 54 मोबाईल फोन लांबवले. 

ट्रेंडिंग बातमी - 'मुख्यमंत्री कोण होणार हे आधी ठरवा, मगच दिल्लीत या' भाजप श्रेष्ठींचा आदेश, टेन्शन कोणाचं वाढणार?

सकाळी दुकानदार दुकानात आल्यानंतर त्याला मोबाईल दिसले नाहीत. त्याने सीसीटीव्ही पाहील्यानंतर दुकानात चोरी झाल्याचे त्यांच्या लक्षात आले. त्यांनी तात्काळ पोलिसांना याबाबतची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी या तरूणाला अटकही केली. त्याच्याकडून 41 मोबाईल जप्तही करण्यात आले. त्यानंतर त्याला कोर्टा समोर हजर करण्यात आले. त्याला कोर्टाने 27 नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. सीसीटीव्हीच्या माध्यमातून त्याला पकडण्यात आले. फी भरण्यासाठी चोरी केल्याची कबूली त्याने यावेळी दिली. 

Advertisement