Kalyan News: कल्याणमध्ये 3 हजार लिटर गावठी दारू जप्त, 2 आरोपींना अटक, कुठे आणि कसा रचला सापळा?

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कल्याण परिसरात गावठी दारूची सप्लाय करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या पथकाने जवळपास 3 हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे.

जाहिरात
Read Time: 2 mins
3000 Liter Seized In Kalyan

Kalyan Crime News : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने कल्याण परिसरात गावठी दारूची सप्लाय करणाऱ्यांवर मोठी कारवाई केली आहे. या पथकाने जवळपास 3 हजार लिटर हातभट्टी दारू जप्त केली आहे. या प्रकरणी दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडे 7.40 लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.या प्रकरणी दारूबंदी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून रविंद्र बबन भोईर आणि नयन मुकुंद म्हात्रे या दोन आरोपींना अटक करण्यात आली आहे.

सूत्रांनी दिलेल्या माहितीच्या आधारे, राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने 16 एप्रिल 2026 रोजी भिवंडी बायपास,मुंबई-नाशिक रोडवरील राजनोली गाव परिसरात सापळा रचला होता.त्यावेळी पथकाला रात्रीच्या सुमारास संशयित पांढऱ्या रंगाची महिंद्रा बोलेरो पिकअप कार दिसली. अधिकाऱ्यांनी त्या कारचा पाठलाग केला आणि त्या कारची तपासणी केली. 

Advertisement

नक्की वाचा >> Dombivli News: डोंबिवलीत गुंडगिरी, केडीएमसी अधिकाऱ्यांना बांबूने मारलं, पेंढारकर कॉलेज परिसरात काय घडलं?

पुरवठादार आणि खरेदीदार यांचा शोध घेण्यासाटी अधिकारी सज्ज 

तपासणीदरम्यान वाहनाच्या मागील बाजूस 70 गोण्यांमध्ये प्रत्येकी 4 अशा एकूण 300 प्लास्टिक पिशव्या आढळून आल्या. प्रत्येक पिशवीत अंदाजे 10 लिटर गावठी दारू भरलेली होती. अशाप्रकारे एकूण तीन हजार लिटर हातभट्टी दारू जप्त करण्यात आली. चौकशीत आरोपींनी दिलेल्या माहितीनुसार,ही गावठी दारू ठाणे जिल्ह्यातील देसाई गाव परिसरात तयार करून नाशिक जिल्ह्यात विक्रीसाठी नेण्यात येत होती.या रॅकेटमधील दारू तयार करणारे,पुरवठादार आणि खरेदीदार यांचा शोध घेण्यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून पुढील तपास सुरू आहे.

नक्की वाचा >> Kalyan News: "सत्ता पैसा गुंडगिरी...", कल्याणमध्ये वरुण सरदेसाईंचा शिंदे गटाला इशारा, "मधूर म्हात्रे बेईमान.."