जाहिरात

Extramarital affair: पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या, प्रियकराकडे पोहोचली, शरीर संबंध करतानाच पुढे

एक 32 वर्षाची महिला बरेलीत राहात होती. त्यांच्या इथेच इकबाल हा काम करत होता. तो कारागिर होता. त्यामुळे त्या महिलेच्या घरी त्याचे येणे जाणे होते.

Extramarital affair: पतीला झोपेच्या गोळ्या दिल्या, प्रियकराकडे पोहोचली, शरीर संबंध करतानाच पुढे

उत्तर प्रदेशातील बरेलीइथे एक हैराण करणारे हत्येचे प्रकरण समोर आले आहे. एक व्यक्ती एका विवाहीत महिलेला वारंवार शरिर संबंधासाठी दाबाव टाकत होता. शिवाय तिला ब्लॅकमेल करत होता. त्यामुळे त्या महिलेने टोकाचे पाऊल उचलण्याचा निर्णय घेतला. ज्या वेळी त्या महिलेला त्या व्यक्तीने शरिर संबंधासाठी घरी बोलावलं त्याच वेळी तिने डाव साधला. त्या व्यक्तीचा तिने तिथेच मुडदा पाडला. शिवाय त्याचा मृतदेह त्याच्याच घराबाहेर टाकून तीने पळ काढला. त्यानंतर पोलिसांनी एका 32 वर्षीये महिलेला अटक केली. तिन या संपूर्ण हत्येचा घटनाक्रम सांगताच, पोलिसांच्या पाया खालची वाळू सरकली. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )

एक 32 वर्षाची महिला बरेलीत राहात होती. त्यांच्या इथेच इकबाल हा काम करत होता. तो कारागिर होता. त्यामुळे त्या महिलेच्या घरी त्याचे येणे जाणे होते. त्यातून दोघांची ओळख झाली होती. त्यातून त्या दोघांनी आपले मोबाईल नंबर एकमेकांना दिले होते. त्यातून दोघांमध्ये फोनवरून बोलणं होवू लागलं. पुढे इकबालने तिला आपल्या घरी यायला सांगितलं. त्यानंतर इकबालने तिला शरिर संबध ठेवण्यास प्रवृत्त केलं असं महिलेने पोलिसांना सांगितलं. हे वारंवार होत होतं. त्यामुळे हे सर्व घरी सांगेन असं महिलेनं इकबालला सांगितलं. 

ट्रेंडिंग बातमी - CIDCO Lottery 2025 : सिडकोचे माझे पसंतीचे घर! प्रतिक्षा संपली लॉटरीची तारीख ठरली

मात्र आपल्याकडे सर्व कॉल रेकॉर्डींग आहेत. त्या मी तुझ्या घरी देईन. तुझा संसार उद्धवस्त होईल अशी धमकी त्याने तिला दिलीय. त्यानंतर वारंवार दोघांच्या भेटी होवू लागल्या. महिलेला लहान मुलं आहेत. त्यांच्यासाठी मी हे सर्व सहन करत होती. तो वारंवार शरिर संबंधासाठी आपल्याला ब्लॅकमेल करत होता असंही तिने पोलिसांना सांगितलं. त्याच्या या सततच्या ब्लॅकमेलमुळे आपण त्रासलो होतो असंही ती म्हणाली. बुधवारी इकबाल हा त्याच्या पत्नीला तिच्या आईवडीलांच्या घरी सोडण्यासाठी गेला होता. तो ज्या वेळी परत आला त्यावेळी त्याला मी भेटले होते. शिवाय भेटायचं आहे असा निरोपही दिला होता. असं ती आपल्या जबाबात सांगते. 

Latest and Breaking News on NDTV

ट्रेंडिंग बातमी - Crime news: अडीच लाख रुपये, लग्नाचा तगादा, केसची धमकी अन हत्या, महिलेच्या हत्येची इनसाईड स्टोरी

इकबालनेही तिला भेटण्याची तयारी दर्शवली. पतीला झोप यावी यासाठी त्याने तिला झोपेच्या गोळ्या दिल्या. रात्री आठ वाजता तिने आपल्या पतीला चहा दिली. त्या चहामध्ये तिने झोपेच्या गोळ्या टाकल्या होत्या. त्यानंतर तिचा पती लगेचचं झोपी गेला. रात्री जवळपास पावणे बारा वाजता तिने इकबालला फोन लावला. त्याने तिला घरी येण्यास सांगितले. शिवाय घरी एकटाच असल्याचं ही त्याने त्या महिलेला सांगितले. 

ट्रेंडिंग बातमी - Kalyan Crime News: 'जामीन झाला नाही तर एके 47 घेऊन येतो' आधी अन्यायनंतर धमकी

इकबाल आपल्याला वारंवार ब्लॅकमेल करून त्रास देत होता. त्यामुळे आपण कंटाळलो होतो, असं या महिलेने सांगितले. ज्या वेळी इकबालच्या घरी जाण्यासाठी ती निघाली त्यावेळी तिने ठरवलं होतं, की एक तर त्याला तरी मारेन किंवा मी तरी मरेन. ती त्याच्या घरी पोहोचली. त्यानंतर दोघे गप्पा मारत बसले होते. त्यानंतर तो शरिर संबध करण्यासाठी तिच्या जवळ आला. त्यावेळी तिने त्याचे दोन्ही हात पकडले. त्यानंतर ती त्याच्या छातीवर बसली. एक हात त्याच्या तोंडावर दाबला. तर दुसऱ्या हाताने तिने त्याचा गळा आवळला. त्यात त्याचा जागीच मृत्यू झाला. तो ठार झाला आहे याची खात्री केल्यानंतर त्याचा मृतदेह तिने त्याच्या घराबाहेर टाकून दिला. त्यानंतर ती घरी आली. मी इकबालवर प्रचंड नाराज होती. माझ्या कुटुंबाला वाचवण्यासाठी माझ्याकडे दुसरा कोणता पर्याय नव्हता असं तीने शेवटी सांगितले.