जाहिरात

Emiway Bantai प्रसिद्ध हिप हॉप गायक 'एमीवे बंटाय' याला जीवे मारण्याची धमकी

 हिप हॉप गायक आणि 'एमीवे बंटाय' (Emiway Bantai) म्हणून प्रसिद्ध असलेला बिलाल शेख याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.

Emiway Bantai प्रसिद्ध हिप हॉप गायक 'एमीवे बंटाय' याला जीवे मारण्याची धमकी
नवी मुंबई:

प्रथमेश गडकरी, प्रतिनिधी

 हिप हॉप गायक आणि 'एमीवे बंटाय' (Emiway Bantai) म्हणून प्रसिद्ध असलेला बिलाल शेख याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे.  बंटाय म्युझिक कंपनीच्या अधिकृत मोबाईल क्रमांकावर मेसेजद्वारे ही धमकी दिली आहे. 

('NDTV मराठी' चं अधिकृत व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करा )
 

धमकी देणाऱ्याने स्वतःची ओळख ‘गँगस्टर गोल्डी ब्रार' अशी करून, “तुझ्या सिंगरकडे 24 तास आहेत, 1 कोटी रुपये दे, नाहीतर ठार मारू,” असा इशारा दिला. या मेसेजमध्ये गँगस्टर लॉरेन्स बिष्णोई ग्रुप, गँगस्टर लॉन ग्रुप आणि गँगस्टर रोहित गोदरा यांच्या नावांचाही उल्लेख करण्यात आला आहे.

ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड

( नक्की वाचा :  ज्योती मल्होत्राचा थेट होता ISI शी संपर्क, पाकिस्तानात AK 47 घेऊन... नव्या Video मधून अनेक रहस्य उघड )

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, कालच एमीवे बंटाय याने प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला याला श्रद्धांजली अर्पण करणारे 'ट्रिब्युट टू सिद्धू मुसेवाला' हे गाणं प्रदर्शित केलं होतं. याच गाण्याच्या काही तासांनंतर ही धमकी आल्याने प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.

या प्रकरणी एनआरआय पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Track Latest News Live on Marathi.NDTV.com and get news updates from India and around the world

Follow us:
Listen to the latest songs, only on JioSaavn.com